देशभरातील तब्बल ३० हजार मुलांनी कोरोना संसर्गामुळे गमावले पालक


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशभरातील तब्बल ३० हजार ०७१ एवढ्या मुलांनी कोरोना संसर्गामुळे पालक गमावले असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने याबाबतची माहिती सर्वोच्च न्यायालयासमोर सादर केली. 30 thousand children lost parents due to covid

तब्बल २६ हजार १७६ मुलांनी त्यांचे पालक गमावले असून त्यातील ३ हजार ६२१ अनाथ झाले असून २७४ जणांना पालकांनीच सोडून दिल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक मुले अनाथ झाले असून त्यांची संख्या ७ हजार ०८४ एवढी आहे. अनेक राज्यांनी त्यांच्याकडील अनाथ झालेल्या मुलांची माहिती अद्याप बाल स्वराज पोर्टलवर अपलोड केली नसल्याचे आयोगाने म्हटले आहे.


नवे लसीकरण धोरण : वाचा सविस्तर 21 जूनपासून राज्यांना कशा प्रकारे होणार केंद्राकडून लसींचे वाटप


कोरोना संसर्गामुळे अनाथ झालेल्या मुलांना आधार देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या योजनेचा तपशील सादर करण्यासाठी आणखी वेळ दिला जावा अशी मागणी सरकारकडूनच सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आली आहे. न्यायालयाने देखील ती मान्य केली. ‘पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन’ या योजनेच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येईल.

30 thousand children lost parents due to covid

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात