बंडातात्या कराडकर यांचा पायी वारीसाठी इशारा, देहूकरांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट

शासनाने पायी वारी नेण्यासाठी निर्बंध घालून परवानगी द्यावी, अन्यथा वारीला येणारा समाज अनियंत्रित असेल आणि त्यावेळी काही कायदा सुवस्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील असा इशारा वारकऱ्यांचे नेते हभप बंडातात्य कराडकर यांनी दिला आहे. देहू संस्थानच्या विश्वस्तांनी पायी वारी सोहळा नेण्याच्या मागणीसाठी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.Dehukar meets Devendra Fadnavis


प्रतिनिधी

पुणे : शासनाने पायी वारी नेण्यासाठी निर्बंध घालून परवानगी द्यावी, अन्यथा वारीला येणारा समाज अनियंत्रित असेल आणि त्यावेळी काही कायदा सुवस्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील

असा इशारा वारकऱ्यांचे नेते हभप बंडातात्य कराडकर यांनी दिला आहे. देहू संस्थानच्या विश्वस्तांनी पायी वारी सोहळा नेण्याच्या मागणीसाठी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.यंदाच्या वषीर्ही आषाढीवरीवर कोरोनाचे सावट आहे त्यामुळे मागीलवर्षी प्रमाणे सर्व प्रमुख सोहळ्याच्या पादुका थेट बसमधून नेण्यासाठीचा प्रस्ताव शासनांकडून देण्यात आला होता. मात्र सर्व सोहळा प्रमुखांनी त्याला नकार देत पायी वारी करण्याची आग्रही भूमिका मांडली होती.

त्यानुसार सर्व मागण्यांचा विचार करून शासनाने गठीत केलेली समितीने आपला अहवाल मंत्रिमंडळाकडे पाठवला आहे. मात्र त्या अहवालावर निर्णय येण्याआधीच वारकºयांनी आपली भूमिका स्पष्ट करत आषाढीवारी पायीच नेणार असे म्हटले आहे.

दुसरीकडे सर्व पालखी सोहळे वेगवेळ्या वाटेने जाणार असल्याने प्रशासनावर ताण येणार असेल तर सर्व पालख्या एकाच मार्गावरून नेल्या जाव्यात असा ऐतिहासिक आणि धाडसी प्रस्ताव सोहळ्यातील मुख्य मानकरी राजा भाऊ चोपदारांनी मांडून शासना समोर आणखी एक पर्याय ठेवला आहे. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणी शासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, देहू संस्थानच्या विश्वस्तांनी पायी वारी सोहळा नेण्याच्या मागणीसाठी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पंढरीच्या आषाढी पायी वारीसाठी बायो-बबल पद्धतीचा अवलंब करीत काही निवडक वारक परवानगी देण्यात यावी,अशी मागणी केली. वारीचा कालावधी, संख्येवरील निबंर्धांसह मार्गावरील सर्व गावांचा ठराव असे अनेक प्रस्ताव त्यांनी दिले आहेत.

कोविडच्या नियमांचे पालन करतानाच हजारो वर्षांच्या गौरवशाली परंपरेत सुद्धा खंड पडू नये, असा अतिशय व्यवहार्य प्रस्ताव त्यांनी दिला आहे. यासंदर्भात मी स्वत: मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करेन, असे फडणवीस यांनी सांगितले.

विठ्ठल रूख्मिणी मंदिरे समितीचे सदस्य शिवाजी महाराज मोरे, संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे, अध्यात्मिक समन्वय आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे भाऊ महाराज फुरसुंगीकर संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे संजय महाराज धोंडगे, वारकरी संघटनांचे प्रतिनिधी रमेश महाराज वाघ, विकास घांग्रेकर यांच्यासह वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Dehukar meets Devendra Fadnavis

महत्त्वाच्या बातम्या