मॉडेलसोबत केली मजा, भाजपाच्या पदाधिकाऱ्याचे फोटो दोन वर्षांनी व्हायरल झाले आणि…

काठमांडूची ट्रिप, मॉडेलसोबतची मजा एका भाजपा पदाधिकाऱ्याला चांगलीच महागात पडली आहे. दोन वर्षांनंतर ऐन निवडणुकांच्या तोंडावर व्हायरल झालेल्या फोटोंनी त्याच्या भवितव्यासमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.Fun with model, photo of BJP office bearer went viral after two years


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : काठमांडूची ट्रिप, मॉडेलसोबतची मजा एका भाजपा पदाधिकाऱ्याला चांगलीच महागात पडली आहे. दोन वर्षांनंतर ऐन निवडणुकांच्या तोंडावर व्हायरल झालेल्या फोटोंनी त्याच्या भवितव्यासमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

भाजपच्या युवा मोचार्चे नेते विकास दुबे यांचा एका मॉडेलसोबतचा आक्षेपार्ह परिस्थितीतील फोटो सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. विकास दुबे हे कानपूर-बुंदेलखंड विभागाचे भाजप युवा मोचार्चे अध्यक्ष आहेत.व्हायरल झालेले फोटो दोन वर्षांपूर्वीचे आहेत. विकास दुबे काठमांडू येथे पर्यटनासाठी गेलेले असताना त्यांनी एका मॉडेलसोबत आक्षेपार्ह स्थितीत फोटो काढले. एका बारमध्ये हा फोटो टिपण्यात आला आहे.

विकास दुबे यांच्यासोबत कानपूरमध्ये ड्युटी करत असलेला एक पोलीस अधिकारी आणि दुबे यांचे काही राजकीय मित्र परिवार नेपाळ येथे गेले होते. एका बारमध्ये असताना व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आलं.

यात विकास दुबे एका मॉडेलसोबत अश्लिल पद्धतीने वर्तन करत असल्याचं दिसून येत आहे.याबाबत पक्षात वरीष्ठ नेत्यांकडे याबाबत तक्रार केली गेल्याचंही सांगण्यात आलं आहे.

पण विकास दुबे यांच्याबाबत कुणीही साक्ष देण्यास तयार नसल्यानं त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही. कानपूर-बुंदेलखंड विभागाअंतर्गत एकूण १७ जिल्ह्यांचा समावेश आहे. याचा भाजप प्रभारी म्हणून विकास दुबे कार्यरत आहेत.

Fun with model, photo of BJP office bearer went viral after two years

महत्त्वाच्या बातम्या