वृत्तसंस्था
कनोज / मुंबई : (समाजवादी) “अत्तराचा फाया तुम्ही, मला आणा राया”, अशी प्रसिद्ध मराठी लावणी सध्या मुंबईत आणि उत्तर प्रदेशात काही लोक गुणगुणत आहेत…!! समाजवादी अत्तराचे जनक पियुष जैन यांच्या सहा घरांवर आणि मालमत्तांवर प्राप्तिकर खात्याने जे छापे घातले आहेत त्यात आत्तापर्यंत 160 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडली आहे. यामध्ये कपाटात भरून ठेवलेल्या सुमारे 90 कोटी रुपयांच्या नोटा सापडल्या आहेत. चार मशीन लावून गेल्या दीड दिवसांपासून त्या नोटांची मोजणी सुरू आहे.160 crore unaccounted property confiscated from Piyush Jain’s bungalow
पियुष जैन हे पान मसाला उद्योग समूहाचे प्रमुख आहेत. उत्तर प्रदेशातल्या समाजवादी पक्षाची पक्षाशी त्यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत. समाजवादी आमदार पम्मी जैन तसेच अखिलेश यादव यांचे निकटवर्ती जैनेंद्र यादव यांच्याशी त्यांची घनिष्ठ मैत्री आहे. पम्मी जैन या उत्तर प्रदेश विधान परिषदेच्या सदस्य आहेत. 2022 विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन त्यांनी पियुष जैन समाजवादी अत्तराची निर्मिती केली आहे. या अत्तराचे लॉन्चिंग समाजवादी पक्षाच्या लखनऊच्या मुख्यालयात स्वतः माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केले आहे. 22 फुलांपासून बनलेले हे अत्तर महाग आहे. समाजवादी पक्षाच्या लाल टोपी रंगातल्या आकर्षक बॉक्समध्ये ते सादर करण्यात आले आहे. पण ह्यात त्याची किंमत आता किती “महाग” पडते आहे हे प्राप्तिकर विभागाच्या छाप्यांमधून दिसून आले आहे.
अखिलेश यादव यांचे अनेक निकटवर्ती पियुष जैन यांच्या अत्तराच्या कारभारात आहेतच. त्यांच्याही ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाने छापे घातले आहेत. तेथून अनेक शेल कंपन्यांची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. यातून आणखी मोठे घबाड हाती लागण्याची प्राप्तिकर विभागाला खात्री आहे.
भाजपला उत्तर प्रदेशात आपल्या विजयाची खात्री नसल्याने केंद्रीय संस्थांमार्फत छापे घालण्याचे उद्योग सुरू आहेत, अशा टीका समाजवादी पक्षाकडून सुरू आहेत. परंतु कपाटात भरून ठेवलेल्या नोटांबद्दल आणि शेल कंपन्यांच्या कागदपत्रांबद्दल समाजवादी पक्षाचे नेते बोलायला तयार नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App