वृत्तसंस्था
लखनऊ : Yogi said ‘वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे देशाच्या विकासाच्या गतीला ब्रेक लागतो.’ यामुळे केवळ वेळ आणि संसाधनांचा अपव्यय होत नाही, तर देशाच्या जीडीपीवरही त्याचा थेट परिणाम होतो.Yogi said
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी लखनऊमध्ये हे वक्तव्य केले. देशाला वेगाने पुढे जायचे असेल, तर निवडणूक व्यवस्थेत बदल आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, दरवर्षी निवडणुका घेतल्याने केवळ राजकीय हालचाली वाढत नाहीत, तर विकास प्रकल्पांचा वेगही मंदावतो.
जीडीपीला फटका, ३.५-४ लाख कोटी खर्च
योगी म्हणाले की, वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे देशाच्या जीडीपीवर सुमारे १.५% परिणाम होतो, ज्यामुळे ३.५ ते ४ लाख कोटी रुपये खर्च होतात. ही रक्कम अनेक राज्यांच्या एकूण वार्षिक अर्थसंकल्पापेक्षा जास्त आहे.
१९५२ ते १९६७ पर्यंत निवडणुका एकत्र झाल्या, आता पुन्हा एकदा परत निवडणुका एकत्र होण्याची वेळ आली आहे.
मुख्यमंत्री योगी म्हणाले, १९५२ ते १९६७ पर्यंत देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी झाल्या. आजही काही राज्यांमध्ये हा प्रयोग केला जात आहे. आता ते कायमस्वरूपी करण्याची वेळ आली आहे.
ते म्हणाले- २०३४ पर्यंत देशभरात एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी आपल्याला आतापासूनच जनतेला तयार करावे लागेल.
‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ हे एक जनआंदोलन बनवावे लागेल
मुख्यमंत्री म्हणाले, “ही केवळ राजकीय चर्चा नाही, तर राष्ट्रीय हिताचा मुद्दा आहे. ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ ही आता एक कल्पना राहू नये, ती एक ध्येय बनली पाहिजे. यासाठी समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घ्यावे लागेल.”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App