Priyanka Gandhi : एकनाथ शिंदेंच्या फोटो वरून बॉडी लँग्वेजची चर्चा; पण प्रियांका गांधींच्या बॉडी लँग्वेजकडे सोयीचे दुर्लक्ष, की…??

Priyanka Gandhi

नाशिक : Priyanka Gandhi महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर आणि मंत्रिमंडळावर चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटले त्यांनी सुमारे दीड – दोन तास तिथे चर्चा केली. ती चर्चा समाधानकारक झाल्याचे नंतर एकनाथ शिंदे यांनी सांगितले. परंतु, अमित शहा यांच्या घरी झालेल्या बैठकांमधले काही फोटो माध्यमांमध्ये आल्यानंतर मात्र माध्यम कर्मींनी एकनाथ शिंदेंच्या बॉडी लँग्वेज वर चर्चा सुरू करत वेगवेगळे तर्कवितर्क लढविले. Priyanka Gandhi

त्या फोटोमध्ये अमित शाह, जे. पी. नड्डा, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत असताना फक्त एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर हास्य दिसत नव्हते. ते गंभीरपणे उभे होते, वगैरे बाता माध्यमांनी मारल्या. त्यातून वेगवेगळे निष्कर्ष काढून एकनाथ शिंदे नाराज + अस्वस्थ + निराश असल्याच्या बातम्या चालविल्या. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या दरे गावाला निघून गेले म्हणून देखील एकनाथ शिंदे आता महाराष्ट्रात राजकीय भूकंप आणणार वगैरे बातम्यांची भरमार केली. तो सगळा माध्यमांच्या अविष्कार स्वातंत्र्याचा भाग होता. त्यातून खरंच एकनाथ शिंदे नाराज आहेत का?? ते वेगळा निर्णय घेण्याच्या मन:स्थितीत आहेत का?? आणि ते सगळे खरे असले, तरी एकनाथ शिंदे भाजपच्या नेतृत्वाच्या विरोधात जाऊन वेगळा निर्णय घेऊ शकतील का??, असे सगळे कळीचे सवाल आहेत. पण महाराष्ट्रातील महायुतीतल्या राजकीय चेहऱ्यावरून एकनाथ शिंदे यांच्या बॉडी लँग्वेजची चर्चा माध्यमांनी महाराष्ट्रासह संपूर्ण देशात घडवून आणली. Priyanka Gandhi

– CWC बैठकीत प्रियांका गांधी

पण या सगळ्या पार्श्वभूमीवर काल काँग्रेस कार्यकारिणीची नवी दिल्लीत बैठक झाली. त्या बैठकीला 84 नेते हजर होते. त्यामध्ये खासदार प्रियांका गांधी देखील तिथे हजर होत्या. त्यांनी त्या बैठकीतून इथून पुढची प्रत्येक निवडणूक बॅलेट पेपर वरच हवी. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वर नको, अशी ठाम भूमिका मांडली. त्या बैठकीचे फोटो काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडल वरून शेअर केले. त्यातला एक फोटो प्रियांका गांधींचा होता. मात्र, त्या फोटोतून प्रियांका गांधींची बॉडी लँग्वेज कशी दिसली??, त्या काय सुचवू पाहत होत्या??, वगैरे चर्चाच कुठल्या माध्यमांनी घडवून आणली नाही. Priyanka Gandhi


 Imtiaz Jalil ईव्हीएमवर निवडणुका घेऊ नका, ताकद कळेल, इम्तियाज जलील यांचा सरकारला इशारा


वास्तविक काँग्रेसमध्ये प्रियांका गांधींची प्रतिमा इंदिरा गांधींसारखी रंगविली जाते. वायनाड मधून प्रियांका गांधी निवडून येताच उत्तर प्रदेशात “इंदिरा इज बॅक” अशी पोस्टर्स झळकली होती. प्रियांका गांधींमध्ये इंदिरा गांधींचे स्वभाव दर्शन घडते, असा काँग्रेसजन नेहमीच दावा करतात. मल्लिकार्जुन खर्गे यांनी शेअर केलेल्या फोटोमधून प्रियांका गांधींचा चेहरा इंदिरा गांधींची मिळताजुळता असल्याचे दिसले. इतकेच काय, पण त्यांची “नजर” आणि चेहऱ्यावरची “मस्ती” देखील दिसली.

– प्रियांका गांधींची नुसतीच बॉडी लँग्वेज

पण कुठल्याच माध्यमांनी प्रियांका गांधींच्या त्या बॉडी लँग्वेजच्या फोटोची चर्चाच केली नाही. मग आता काँग्रेससाठी जरी प्रियांका गांधी महत्त्वाच्या नेत्या असल्या आणि ताया अगदी थेट “इंदिरा गांधी” असल्या, तरी देशाच्या राजकारणामध्ये आणि माध्यमकर्मींच्या बॉडी लँग्वेजच्या अभ्यासात प्रियांका गांधी तेवढ्या “महत्त्वाच्या” उरल्या नाहीत का??, हा कळीचा सवाल आहे. Priyanka Gandhi

…की प्रियांका गांधींनी कितीही इंदिरा गांधींसारखी बॉडी लँग्वेज दाखवली, तरी आता त्या काँग्रेसला पुन्हा इंदिरा गांधींसारखे जुने दिवस आणू शकणार नाहीत, याची काँग्रेस नेत्यांना नसली, तरी माध्यमकर्मींना खात्री आहे म्हणूनच त्यांनी प्रियांका गांधींच्या बॉडी लँग्वेजची चर्चा घडवून आणली नाही??, हा मननीय सवाल आहे. पण त्याची उत्तरे माध्यमकर्मी देणार नाहीत. कारण फक्त माध्यमकर्मींना प्रश्न विचारायची सवय आहे. उत्तरे देण्याची नाही!!

What does Priyanka Gandhi body language show??

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात