विशेष प्रतिनिधी
पुणे : Baba Adhav एकटी काँग्रेसच अदानींच्या भ्रष्टाचाराविरोधात बोलते, पण तुम्ही तर आदानींच्या गाडीतून फिरत असता असे सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढावांनी आमदार रोहित पवारांना सुनावले, पण आजच्या शरद पवारांच्या भेटीत बाबांनी पवारांना तेच सुनावले का??, हा सवाल तयार झाला आहे.Baba Adhav
याची कहाणी अशी :
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाले. निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना जाहीर करून महायुतीने त्याचबरोबर महाविकास आघाडीने देखील भ्रष्टाचाराला अधिकृत केले. इथून पुढे बॅलेट पेपरवरच निवडणुका आढाव्यात वगैरे मुद्द्यांवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी वयाच्या 95 व्या वर्षी महात्मा फुले वाड्यात आत्मक्लेश उपोषण सुरू केले. त्यामुळे त्यांच्या भेटीगाठीसाठी महात्मा फुले वाड्यात अनेकांचा राबता सुरू झाला. त्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचाही समावेश होता.Baba Adhav
Imtiaz Jalil ईव्हीएमवर निवडणुका घेऊ नका, ताकद कळेल, इम्तियाज जलील यांचा सरकारला इशारा
रोहित पवार ज्यावेळी बाबांच्या भेटीला गेले, त्यावेळी बाबांनी त्यांना एकटी काँग्रेसच अदानीच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलते, पण तुम्ही तर अदानींच्या गाडीतून फिरत असता, असे रोहित पवारांना सुनावले. रोहित पवार त्यावर गप्प बसले. बाबांनी रोहित पवारांना सुनावल्याच्या बातम्या सगळ्या माध्यमांमध्ये आल्या.Baba Adhav
त्यानंतर आज शरद पवार बाबा आढावांच्या भेटीला महात्मा फुले वाड्यात पोहोचले. तिथे दोघांची चर्चा झाली. त्या चर्चेत बाबा आढावांनी शरद पवारांना अदानी मुद्द्यावर काही सुनावले का??, हा सवाल तयार झाला. बाबा आणि शरद पवार यांच्यातल्या चर्चेच्या वेगवेगळ्या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये आल्या. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा अर्थात EVMs चा मुद्दा, बॅलेट पेपरचा मुद्दा त्याचबरोबर निवडणुकीच्या तोंडावर लोकांना थेट पैसे देण्याचा प्रकार वगैरे मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे बातम्यांमध्ये नमूद केले होते. परंतु, बाबांनी रोहित पवारांना अदानी मुद्द्यावर जे सुनावले होते, नेमके तसेच बाबांनी शरद पवारांना सुनावले का??, यावर मात्र कुठल्या बातम्या समोर दिसल्या नाहीत.
शरद पवारांनी बाबांशी बोलल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी महायुतीला पूर्ण बहुमत मिळून देखील अजूनही सरकार स्थापन होत नसेल, तर ते महाराष्ट्रासाठी अशोभनीय असल्याचा दावा केला. परंतु त्यांनी देखील अदानी + पवार आणि काँग्रेस या संबंधांवर बोलणे टाळले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App