मीडियात बातम्या आर्यन खानबाबत २५ कोटींच्या कथित डीलच्या, पण सोशल मीडियात मात्र बोलबाला भारत – पाक टी २० मॅचचाच


प्रतिनिधी

नवी दिल्ली – मराठी माध्यमांनी सध्या आर्यन खानबाबत २५ कोटींचे डील झाल्याच्या बातम्या चालविल्या आहेत. पण सोशल मीडियात मात्र, आज संडे मूडमध्ये असलेल्या नेटिझन्सनी भारत – पाकिस्तान टी २० मॅचचा बोलबाला चालविला आहे.

Twist In Aryan Khan Case: Witness Claims Payoff, Anti-Drugs Agency Denies

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातला साक्षीदार किरण गोसावी याचा खासगी बॉडिगार्ड प्रभाकर साईल याने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याशी डील झाल्याचा दावा केला आहे. समीर वानखेडे आणि किरण गोसावी यांनी मिळून कशाप्रकारे सर्वांना पकडले याची माहिती प्रभाकर साईलने दिली आहे.


Drugs Case : ड्रग्ज प्रकरणावर स्वामी रामदेव यांची प्रतिक्रिया, म्हणाले- इंडस्ट्रीने मिळून ही घाण काढावी; भारत-पाक सामना राष्ट्रहिताच्या विरोधात !


लोअर परळच्या ब्रीज खाली पहाटे साडेतीन पावणे चारच्या सुमारात सॅम, किरण गोसावी आणि एसआरकेची मॅनेजर होती. त्या तिघांमध्ये मिटिंग झाली. यानंतर त्यानी कारमधूनच आपल्याला फोन केला ‘२५ कोटींचा बॉण्ड’ करायला सांगितला. त्याती ल ८ कोटी समीर वानखेडेंना द्यायचेत आणि १० आपल्याला वाटायचे आहेत, असे ते म्हणाले. पैशांसाठी आम्ही पहाटे साडेपाच वाजेपर्यंत मंत्रालयासमोर रस्त्यावर थांबलो. पण टॅक्सी न मिळाल्याने आम्ही वाशीला घरी निघून आलो. यानंतर काही वेळाने लगेच किरण गोसावीनी आपल्याला महालक्ष्मी स्टेशनजवळ ताडदेवजवळ इंडियाना हॉटेलजवळ थांबायला सांगितले. यानुसार आपल्याला एका कारमधून ५० लाख रुपये घेण्यास सांगितले. ५१०२ असा या कारचा क्रमांक होता, असा दावा साईलने केला आहे.

त्यावर मराठी माध्यमांनी शिवसेना खासदार संजय राऊत तसेच अन्य नेत्यांच्या प्रतिक्रिया प्रसिध्द केल्या आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने प्रभाकर साईलचे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.

मात्र, या पार्श्वभूमीवर सोशल मीडियात मात्र, आज संडे मूडमध्ये नेटिझन्स फक्त भारत – पाकिस्तान टी २० मॅच साजरे करताना दिसत आहेत. ट्विटरवर ही मॅचच सध्या टॉपवर आहे. याखेरीज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात, करवा चौथ हे विषय देखील ट्विटरवर टॉप १० मध्ये आहेत.

Twist In Aryan Khan Case: Witness Claims Payoff, Anti-Drugs Agency Denies

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात