Drugs Case : ड्रग्ज प्रकरणावर स्वामी रामदेव यांची प्रतिक्रिया, म्हणाले- इंडस्ट्रीने मिळून ही घाण काढावी; भारत-पाक सामना राष्ट्रहिताच्या विरोधात !


शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानशी संबंधित मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आता या ड्रग्ज प्रकरणाशी अभिनेत्री अनन्या पांडेचे नावही जोडले गेले आहे. योगगुरू बाबा रामदेव यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. Baba Ramdev Comment On Aryan Khan Drugs Case and T20 world cup India Pak match


वृत्तसंस्था

नागपूर : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानशी संबंधित मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आता या ड्रग्ज प्रकरणाशी अभिनेत्री अनन्या पांडेचे नावही जोडले गेले आहे. योगगुरू बाबा रामदेव यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

बाबा रामदेव यांनी ड्रग्जच्या विळख्याला भारताच्या तरुण पिढीसाठी घातक म्हटले आहे. ते म्हणाले की, जे लोक त्यांना आदर्श मानतात, ते ड्रग्जच्या चक्रात अडकत आहेत. यामुळे लोकांना चुकीची प्रेरणा मिळते. बाबा रामदेव म्हणाले की, ‘संपूर्ण इंडस्ट्रीने एकत्रितपणे ही घाण साफ केली पाहिजे, अन्यथा ते त्यांच्यासाठी (बॉलिवूड इंडस्ट्री) धोकादायक आणि आत्मघातकी ठरेल.”

भारत वि. पाक सामना राष्ट्र हिताविरुद्ध

बाबा रामदेव यांनी रविवारी होणाऱ्या टी-20 विश्वचषकातील भारत-पाक सामनाही राष्ट्रहिताच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. बाबा रामदेव म्हणाले, “या परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आमच्या राष्ट्रीय हित आणि राष्ट्रीय धर्माच्या विरुद्ध आहे. एका बाजूला क्रिकेट आणि दुसरीकडे दहशतवादाचा खेळ असू शकत नाही. बाबा रामदेव नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.


Patanjali Research Trust : बाबा रामदेवांच्या पतंजली रिसर्च फाउंडेशनला दान दिल्यास टॅक्समध्ये मिळेल पाच वर्षांसाठी सूट


पेट्रोल आणि डिझेलवरही दिली प्रतिक्रिया

बाबा रामदेव यांना पत्रकारांनी त्यांच्या जुन्या विधानाची आठवण करून दिली, ज्यात त्यांनी म्हटले होते की, काळा पैसा परत आल्यानंतर इंधनाचे दर कमी होतील, पण असे काहीही का झाले नाही? तर बाबा रामदेव म्हणाले, ‘मी पेट्रोलची किंमत क्रूडनुसार असावी असा सल्ला दिला होता आणि कमी करही सुचवला होता. पण सरकारला अनेक कल्याणकारी कार्यक्रम राबवायचे आहेत आणि आर्थिक आव्हानांनाही तोंड द्यावे लागत आहे. या कारणांमुळे सरकार कर कमी करण्यास सक्षम नाही. पण एक दिवस हे नक्की होईल.

बाबा रामदेव यांनी वेगवेगळ्या विषयांवर आपले मत मांडले. नागपुरात एका कार्यक्रमाअंतर्गत ते आले होते. यादरम्यान, पत्रकारांनी त्यांना नागपूर विमानतळावर घेरले आणि अनेक प्रश्नांवर त्यांचे मत विचारले. बाबा रामदेव यांनीही सर्व प्रकारच्या प्रश्नांवर आपले मत व्यक्त केले.

Baba Ramdev Comment On Aryan Khan Drugs Case and T20 world cup India Pak match

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात