विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात मिळून अद्यापही ७३ लाख कोरोना प्रतिबपंधक लसीचे डोस शिल्लक आहे. आणखी २४ लाख ६५ हजार ९८० डोस पुढील तीन दिवसांत पुरविणार असल्याची माहिती केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.States still have 73 lakh doses of corona vaccine, 25 lakh more to be delivered in three days
आत्तापर्यंत देशात ३२ कोटी १३ लाख ७६ हजार ८२० कोरोना लसीचे डोस केंद्र शासनाकडून राज्येयआणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकारकडून पुरविण्यात आले आहेत. केंद्राकडून हे डोस मोफत देण्यात आले आहेत.
यापैकी ३१ कोटी ४० लाख ६५४ डोस वापरण्यात आले आहेत. त्यामुळे अद्यापही ७३ लाख १६६ डोस शिल्लक आहेत. देशात लसीकरण कार्यक्रम पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी केंद्र शासन बांधिल आहे. लसीकरण मोहीमेला आणखी वेग देण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
केंद्र सरकारकडून लसीकरण मोहीमेला गती दिली जात आहे. जास्तीत जास्त लसीचे डोस उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्रए राज्य सरकारने चांगल्या पध्दतीने नियोजन करून लसींची पुरवठा साखळी व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत करावी, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. देशातील लस उत्पादनापकी ७५ टक्के लसी देशात वापरल्या जात आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App