कोरोनाचे फुकट श्रेय घेणाऱ्या केजरीवालांना भाजपाने सुनावले


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना लसीकरण मोहीम राबविण्याचे फुकट श्रेय घेणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भारतीय जनता पक्षाने सुनावले आहे. लसीकरण कोणामुळे होतेय हे देखील सांगितलेआहे.
दिल्लीतील आप सरकारनं शहरात वेगवेगळ्या ठिकाणी बॅनर लावत लस घेतली का? असा प्रश्न विचारला आहे.BJP slammed Kejriwal for taking credit from Corona

यावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा फोटो आहे. केजरीवाल सरकार काहीच करत नसताना लसीकरणाचं श्रेय घेत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. या विरोधात दिल्ली भाजपाचे उपाध्यक्ष राजीव बब्बर यांनी बॅनरबाजी करत उत्तर दिलं आहे. यात फक्त एक ओळ त्यांनी वाढवली आहे.



लस घेतली का? जी दिल्लीला पंतप्रधान मोदी यांनी मोफत दिली आहे, असं त्या बॅनरमध्ये लिहिण्यात आलं आहे. हे बॅनर जिथे जिथे अरविंद केजरीवाल यांचे बॅनर लागले आहेत, तिथे तिथे लावण्यात आले आहेत. मात्र या पोस्टरवरून अरविंद केजरीवाल यांचा फोटो हटवण्यात आला आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्लीकरांना लस घेतली का? असे विचारत आहेत. आम्ही त्यांचं श्रेय त्यांना दिलं आहे. फक्त पंतप्रधान ही लस मोफत देत आहेत असं नमूद केलं आहे, असे बब्बर यांनी सांगितले. दिल्लीतील आप सरकार राजकारणात गुंतलं असल्याची टीका केली आहे.

BJP slammed Kejriwal for taking credit from Corona

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात