होय हप्तावसुलीसाठीच चौकशी, ईडीने ठणकावल्याने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी हजर राहावेच लागणार


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी केली जाणार आहे. गेल्या वेळी समन्स बजावल्यावर चौकशी कशासाठी होणार आहे हे स्पष्ट नसल्याने त्यांना चौकशीला जाणे टाळले होते. मात्र, आता शंभर कोटी हप्तावसुलीसाठीच चौकशी असल्याचे ईडीने ठणकावून सांगितल्याने देशमुख यांना सकाळी अकरा वाजता ईडी कार्यालयात हजर व्हावेच लागणार आहे.Yes, the inquiry is for recovery of Hapta only,Anil Deshmukh will have to appear for questioning after samans beaten by the ED

देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे व स्वीय सहायक कुंदन शिंदे यांना ईडीने शुक्रवारी मध्यरात्री अटक केली. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने दिलेल्या जबाबामध्ये या दोघांच्या सांगण्यावरून तीन महिन्यांत त्यांना एकूण ४.७० कोटी दिल्याचे म्हटले आहे. त्याच्याकडून ही रक्कम दिल्लीत आणि तेथून नागपूरला एका ट्रस्टकडे वळविण्यात आल्याची माहिती ईडीच्या तपासातून समोर आली आहे.



ईडीने शुक्रवारी देशमुख यांच्या नागपूर व मुंबई येथील निवासस्थानी छापे टाकले होते. देशमुख यांच्याकडेही चौकशी केली होती. त्यानंतर शनिवारी पुन्हा चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्यास बोलाविले होते. मात्र, त्यांनी चौकशी नेमकी कोणत्या विषयासंबंधी करायची आहे, हे प्रथम कळवावे, अशी मागणी वकिलांमार्फत करीत देशमुख यांनी चौकशीला जाण्याचे टाळले.

ईडीने त्याचदिवशी पुन्हा नव्याने समन्स बजावताना मुंबईतून झालेल्या हप्ता वसुलीबाबत चौकशी करायची असल्याचे नमूद करीत २९ जून रोजी ११ वाजता हजर राहण्यासाठी समन्स बजावले. त्यामुळे आता देशमुख यांना अत्यावश्यक कारण उद्भवल्याशिवाय चौकशीला जाणे टाळता येणार नाही.

देशमुख यांनी मुंबईतील बारमालकांकडून दरमहा १०० कोटींचा हप्ता वसुलीचे टार्गेट तत्कालीन सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझेला दिले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. त्याबाबत सीबीआय व ईडीने चौकशी सुरू केली. शुक्रवारी ईडीने मुंबई, नागपूर येथील देशमुख यांच्या निवासस्थानी छापे टाकून मुंबईत जवळपास आठ तास त्यांची चौकशी केली.

त्यानंतर शनिवारी सकाळी ११ वाजता कार्यालयात हजर राहाण्याची सूचना केली होती. देशमुख यांनी शनिवारी कार्यालयात जाणे टाळले. त्यांचे वकील जयवंत पाटील हे त्यांच्या सहकाऱ्यांसह साडेअकराच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात हजर झाले.

त्यांनी अधिकाऱ्यांना समन्सचे उत्तर देताना आपल्या अशिलाकडे कोणत्या विषयासंबंधी चौकशी करायची आहे, त्यासंबंधी कसलाही उल्लेख नाही, तो कळवावा, त्यानुसार संबंधित कागदपत्रे घेऊन त्यांना उपस्थित राहाता येईल, असे सांगितले. त्यामुळे आता ईडीने हप्तावसुलीबाबत चौकशी करायची आहे असे स्पष्ट केले आहे.

Yes, the inquiry is for recovery of Hapta only,Anil Deshmukh will have to appear for questioning after samans beaten by the ED

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात