केंद्र सरकारचा सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा!, तब्बल 400 वस्तू आणि 80 सेवांवरील GST मध्ये घट, आता इतक्या स्वस्त!

Modi Government have been reduced Overall GST rates on 400 goods and 80 services

GST Rates : वाढलेल्या महागाईमुळे त्रस्त सर्वसामान्यांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. यानुसार तब्बल 400 वस्तू आणि 80 सेवांवरील जीएसटी (GST) दर कमी करण्यात आला आहे. या वस्तू आणि सेवांवर केंद्र व राज्य यांचा एकत्रित जीएसटी 31 टक्के इतका होता. जीएसीटी कमी केल्याने करदात्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिली. Modi Government have been reduced Overall GST rates on 400 goods and 80 services


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : वाढलेल्या महागाईमुळे त्रस्त सर्वसामान्यांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. यानुसार तब्बल 400 वस्तू आणि 80 सेवांवरील जीएसटी (GST) दर कमी करण्यात आला आहे. या वस्तू आणि सेवांवर केंद्र व राज्य यांचा एकत्रित जीएसटी 31 टक्के इतका होता. जीएसीटी कमी केल्याने करदात्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिली.

काय झाले स्वस्त?

केसांचे तेल, टूथपेस्ट आणि साबण यासारख्या घरगुती वापराच्या वस्तूंवर जीएसटीपूर्वी 29.3 टक्के कर असायचा. जीएसटी आल्यावर यावरील कर 18 टक्के करण्यात आला आहे. तसेच वॉशिंग मशीन, व्हॅक्युम क्लीनर आणि टीव्ही यांसारख्या घरगुती उपकरणांवर लागणारा कर 31.3 टक्क्यांवरून थेट 18 टक्के करण्यात आला आहे.

सिनेमाच्या तिकिटांवरील पूर्वी 35 ते 110 टक्के कर असायचा. जीएसटीनंतर 100 रुपयांच्या तिकिटावर 12 टक्के आणि इतर तिकिटांवर 18 टक्के कर झाला आहे.

कृषी क्षेत्रासाठी मोठी सवलत देण्यात आली आहे. खतांवरील जीएसटी निम्मा करण्यात आला आहे. कृषी अवजारांवर कर 15% ते 18% वरून 12% पर्यंत खाली आणण्यात आला आहे. तर काही वस्तूंवर कर 8% वरून 5% करण्यात आला आहे. रासायनिक खतांवर केवळ 5 टक्के कर लागू आहे.

छुपे कर कमी केल्याने स्वदेशी उद्योगांना चालना

दरम्यान, देशात 1 जुलै 2017 पासून जीएसटी लागू करण्यात आला आहे. मागील 4 वर्षांत जीएसटी दर कमी केल्याने सर्वसामान्यांवरील कराचा प्रचंड बोझा हलका झाला आहे. अनेक छुपे कर कमी केल्याने आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये स्वदेशी उद्योगांनाही मोठी चालना या काळात मिळाली आहे.

Modi Government have been reduced Overall GST rates on 400 goods and 80 services

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात