खेल रत्न पुरस्कारासाठी मिथाली राज, आर. अश्विनच्या नावाची शिफारस, अर्जुन पुरस्कारासाठी 3 खेळाडू नामांकित

BCCI Suggest R Ashwin And Mithali Raj For Khelratna Award to Sports Ministry

Khelratna Award : भारताचा अव्वल फिरकीपटू आर. अश्विन आणि महिला क्रिकेटची कर्णधार मिताली राज यांच्या नावांची शिफारस खेलरत्न पुरस्कारांसाठी करण्यात आली आहे. बुधवारी बीसीसीआयने खेलरत्न पुरस्कारासाठी क्रीडा मंत्रालयाकडे ही शिफारस केली. शिवाय भरवशाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, स्फोटक सलामीवीर शिखर धवन, केएल राहुल यांना अर्जुन पुरस्कारांसाठी नामांकित करण्यात आले आहे. BCCI Suggest R Ashwin And Mithali Raj For Khelratna Award to Sports Ministry


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारताचा अव्वल फिरकीपटू आर. अश्विन आणि महिला क्रिकेटची कर्णधार मिताली राज यांच्या नावांची शिफारस खेलरत्न पुरस्कारांसाठी करण्यात आली आहे. बुधवारी बीसीसीआयने खेलरत्न पुरस्कारासाठी क्रीडा मंत्रालयाकडे ही शिफारस केली. शिवाय भरवशाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, स्फोटक सलामीवीर शिखर धवन, केएल राहुल यांना अर्जुन पुरस्कारांसाठी नामांकित करण्यात आले आहे.

बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने वृत्तसंस्था एएनआयला म्हटले की, “आमची सविस्तर चर्चा झाली आणि अश्विन व महिला कसोटी व एकदिवसीय कर्णधार मिताली यांचे नाव खेलरत्न पुरस्कारासाठी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. आम्ही अर्जुनसाठी पुन्हा धवनची शिफारस करत आहोत, तर राहुल आणि बुमराह यांचीही नावे सुचवली आहेत.”

तत्पूर्वी, युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 21 जून, 2021 पासून 5 जुलै, 2021 पर्यंत वाढवली. मिताली राजला पुरस्कार जाहीर झाल्यास खेळातील सर्वोच्च सन्मान मिळवणारी ती पहिला महिला क्रिकेटपटू ठरणार आहे. आतापर्यंत सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मात्र, कोणत्याही महिला क्रिकेटपटूला आजवर हा सन्मान मिळालेला नाही.

खेल रत्न हा भारताचा सर्वोच्च क्रिडा सन्मान आहे. मिताली देशाची एक आघाडीची रन-स्कोरर आहे आणि खेळतील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे. आपल्या कारकीर्दीत तिने आतापर्यंत 11 कसोटी, 215 वनडे आणि 89 टी -20 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तिने आठ शतके आणि 77 अर्धशतकांसह सर्व प्रकारात एकत्रित 10,203 धावा केल्या आहेत.

दुसरीकडे, अश्विन त्याच्या पिढीतल्या सर्वोत्कृष्ट गोलंदाजींपैकी एक आहे. अश्विनने आतापर्यंत 79 टेस्ट, 111 वनडे आणि 46 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे. त्याने तीनही स्वरूपात एकत्रितपणे 615 विकेट्स घेतल्या आहेत.

BCCI Suggest R Ashwin And Mithali Raj For Khelratna Award to Sports Ministry

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात