सावधान : कोरोनाची लस घेण्यापूर्वी पेन किलर वापरू नका, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

WHO Warns Do not intake pain killers before taking corona vaccine, Read to know why

corona vaccine : कोरोना महामारीविरुद्ध 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण सुरू आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या लसींबद्दल असे म्हणतात की, लसीकरणानंतर यामुळे सौम्य किंवा मध्यम स्वरूपाचे साइड इफेक्ट होत आहेत. लसीकरणानंतर झालेल्या सर्वात सामान्य लक्षणांमध्ये शरीरातील वेदनांचा समावेश आहे. पण वेदना कमी करण्यासाठी आपण पेन किलर वापरले पाहिजे का? जाणून घ्या… WHO Warns Do not intake pain killers before taking corona vaccine, Read to know why


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना महामारीविरुद्ध 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण सुरू आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या लसींबद्दल असे म्हणतात की, लसीकरणानंतर यामुळे सौम्य किंवा मध्यम स्वरूपाचे साइड इफेक्ट होत आहेत. लसीकरणानंतर झालेल्या सर्वात सामान्य लक्षणांमध्ये शरीरातील वेदनांचा समावेश आहे. पण वेदना कमी करण्यासाठी आपण पेन किलर वापरले पाहिजे का? जाणून घ्या…

जागतिक आरोग्य संघटनेने असा इशारा दिला आहे की, संभाव्य साइड इफेक्ट टाळण्यासाठी कोरोनावरील लस घेण्यापूर्वी पेन किलर वापरण्याची शिफारस केलेली नाही, कारण यामुळे लसीच्या प्रभावावर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत लस मिळाल्यानंतर एखाद्याला ताप, वेदना, डोकेदुखी, स्नायू दुखत असल्यास काय करावे? जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, वेदना, ताप, डोकेदुखी किंवा स्नायू दुखणे अशा दुष्परिणामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी लसीकरणानंतर पेन किलर किंवा पॅरासिटामोलचा वापर केला जाऊ शकतो, परंतु लसीकरण घेण्यापूर्वी ती घेऊ नये.

पेन किलरची शिफारस नाही

अनेक बनावट पोस्ट व्हायरल झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेचे हे निवेदन केले आहे. सोशल मीडियावरील पोस्टनुसार, लसीच्या संभाव्य दुष्परिणामांपासून मुक्त होण्यासाठी कोविड-19 लस घेण्यापूर्वी पेन किलर घेण्याची सूचना देण्यात आली आहे. एका प्रवक्त्याच्या हवाल्याने सांगितले आहे की, “दुष्परिणाम रोखण्यासाठी कोविड-19 लस घेण्यापूर्वी पॅरासिटामॉल घेण्याची शिफारस केलेली नाही. तथापि, डोकेदुखी, ताप, स्नायू दुखणे, लसीकरणानंतर होणाऱ्या दुष्परिणामांच्या बाबतीत तुम्ही पेन किलर किंवा पॅरासिटामोल घेऊ शकता.

पेन किलर लसीचा प्रभाव मर्यादित करू शकते – डब्ल्यूएचओ

जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे की, हाताचे दुखणे, डोकेदुखी, थकवा या लसीचे सामान्य दुष्परिणाम बहुतेक प्रकरणांमध्ये किरकोळ असतात. परंतु अँटीहिस्टामाइन्समुळे एलर्जीची प्रतिक्रिया कमी होऊ शकते. आपण आधीपासूनच कोणतीही औषधे घेत असल्यास आपण आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा, कारण काही लोकांना एलर्जीच्या प्रतिक्रियेसाठी अँटीहिस्टामाइन्स लिहून दिले जाऊ शकते. तज्ज्ञ म्हणतात की, लस घेण्यापूर्वी पेन किलर घेण्याचे कोणतेही कारण नाही, कारण यामुळे लसीचा प्रभाव मर्यादित होऊ शकतो.

WHO Warns Do not intake pain killers before taking corona vaccine, Read to know why

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात