Raj Kaushal Death : प्रसिद्ध अभिनेती मंदिरा बेदींचे पती राज कौशल यांचे हार्ट अटॅकने निधन

Bollywood Actress Mandira Bedi Husband Raj Kaushal Death

Raj Kaushal Death : बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी यांचे पती राज कौशल यांचे निधन झाले आहे. राज कौशल यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राज कौशल यांना आज पहाटे साडेचार वाजता राहत्या घरी हृदयविकाराचा झटका आला आणि कुटुंब वैद्यकीय मदत मिळवण्यापूर्वीच राज कौशल यांचे निधन झाले. Bollywood Actress Mandira Bedi Husband Raj Kaushal Death


विशेष प्रतिनिधी

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी यांचे पती राज कौशल यांचे निधन झाले आहे. राज कौशल यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राज कौशल यांना आज पहाटे साडेचार वाजता राहत्या घरी हृदयविकाराचा झटका आला आणि कुटुंब वैद्यकीय मदत मिळवण्यापूर्वीच राज कौशल यांचे निधन झाले.

राज कौशल आणि मंदिरा बेदी यांना दोन मुले आहेत. राज कौशल निर्माता व स्टंट दिग्दर्शक होते. राज यांनी एक अभिनेता म्हणून करिअरची सुरुवात केली होती. बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी राज कौशल यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. राज कौशल यांनी आपल्या कारकीर्दीतील तीन चित्रपट ‘प्यार में कभी कभी’, ‘शादी का लड्डू’ आणि ‘अँथनी कौन है’ हे तीन चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.

मंदिरा बेदी आणि राज कौशल यांची 1996 मध्ये प्रथम मुकुल आनंदच्या घरी भेट झाली. मंदिरा तेथे ऑडिशनसाठी पोहोचली होती आणि राज मुकुल आनंदचे सहायक म्हणून काम करत होते. येथूनच दोघांचे प्रेम सुरू झाले. मंदिरा बेदी यांनी 14 फेब्रुवारी 1999 रोजी राज कौशलशी लग्न केले. खरंतर मंदिराच्या आई-वडिलांची इच्छा होती की, तिचे लग्न एखाद्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाशी व्हावे. पण दोघांच्या प्रेमापुढे कोणाचेही चालले नाही. 27 जानेवारी 2011 रोजी मंदिराने मुलाला जन्म दिला. यानंतर 2020च्या ऑक्टोबरमध्ये त्यांनी चार वर्षांची मुलगी दत्तक घेतली होती.

Bollywood Actress Mandira Bedi Husband Raj Kaushal Death

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण