तज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या तारखा सांगणे चुकीचे – पॉल यांचे मत


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या संभाव्य तारखा सांगणे अनेक तज्ज्ञांनी सुरू केले आहे. मात्र ही लाट कधी येणार याच्या तारखा सांगणे उचित नव्हे, अशा शब्दांत सरकारने याबद्दल नापसंती व्यक्त केली. यामुळे नागरिकांत विनाकारण संभ्रम निर्माण होण्याची भीती सरकारला वाटत आहे. Experts are wrong to say the dates of the third wave of corona – Paul’s opinion

याबाबत कोविड व्यवस्थापन प्रमुख व निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले, तिसऱ्या लाटेची तारीख, महिना आताच ठरविणे योग्य नाही. नागरिकांनी आरोग्य नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. डेल्टा प्लस या नव्या प्रकारावर लसदेखील प्रभावी ठरत नाही व हा प्रकार लसीच्या प्रभावावर प्रतिकूल परिणाम करतो याचे वैज्ञानिक व संशोधकीय पुरावे अजून मिळालेले नाहीत.



दरम्यान, केंद्र सरकारने फायझर व मॉडर्ना या विदेशी लशींना लवकरात लवकर मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती डॉ. पॉल यांनी दिली. भारताच्या कोव्हॅक्सीनला जागतिक आरोग्य संघटनेने आणीबाणीच्या परिस्थितीत मंजुरी द्यावी यासाठीची प्रक्रिया वेगवान आहे. डब्ल्यूएचओकडे याबाबतची सर्व माहिती पोचविण्यात आली असून त्यांचा सकारात्मक निर्णय नजीकच्या दिवसांत येईल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Experts are wrong to say the dates of the third wave of corona – Paul’s opinion

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात