कोरोनाचा संसर्ग आता जंगलातही पोहोचला, चार नक्षलवाद्यांचा मृत्यू


विशेष प्रतिनिधी

हैदराबाद : कोरोनाचा संसर्ग जंगलातही पोचला आहे. जनतेसाठी कर्दनकाळ ठरणाऱ्या नक्षलवाद्यांनाही त्याने घेरले आहे. परिणामी गेल्या १५ दिवसांत चार नक्षलवाद्यांची कोरोनामुळे मृत्यू झाला. Four naxalies killed due to corona

दंडकारण्यातील अन्य ११ नक्षलवादी कोरोनाबाधित आहे. कोरोनाची लागण झालेल्या नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करावे, म्हणजे त्यांच्यावर चांगले उपचार करून त्यांचा जीव वाचविता येईल, असे आवाहन तेलंगणमधील वरंगल, खम्मम आणि आंध्र प्रदेशमधील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांनी केले आहे.



कोरोनाच्या संसर्गाने नक्षलवादी तेलंगण समितीचा सचिव हरिभूषण व त्याची पत्नी जज्जरला सम्मक्का यांचे निधन झाले. ती शबरी दलमची उपकमांडर होती. दंडकारण्यामधील माड विभागातील इंद्रावती भागातील समितीची सदस्य सिद्दाबाईना भारतक्का ऊर्फ सारक्का आणि संदे गंगय्या या नक्षलवाद्यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. गेल्या आठवड्यात या साथीने निधन झालेला नक्षलवादी पक्षाचा मुख्य नेता कत्ती मोहन राव याची भारतक्का ही पत्नी आहे.

Four naxalies killed due to corona

विशेष प्रतिनिधी

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात