छत्तीसगडमध्ये दोन नक्षलवाद्यांचा खात्मा; नारायणपूर जिल्ह्यातील चकमकीत ठार

वृत्तसंस्था

नारायणपूर : छत्तीसगडमध्ये जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही नक्षलवादी माओवादी संघटनेचे आहेत. Two Naxals killed in Chhattisgarh; Killed in an encounter in Narayanpur district

छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात इतुल जंगलात जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. त्यात एक नक्षलवादी मारला गेला. नंतर दुपारी २ वाजण्याच्या सुमारास जवानांनी या भागात शोधमोहीम राबवली तेव्हा लपलेल्या काही नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला.प्रत्युत्तरादाखल जवानांनीही गोळीबार केला. यात आणखी एक नक्षलवादी मारला गेला.  सैन्याने दोन्ही नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले असून हे नक्षलवादी माओवादी संघटनेचे समोर आले आहे.

Two Naxals killed in Chhattisgarh; Killed in an encounter in Narayanpur district

महत्त्वाच्या बातम्या