इस्रोची पहिली मानवविरहित अंतराळ मोहिम डिसेंबरमध्ये, कामाला वेग


विशेष प्रतिनिधी

बंगळूर : ‘गगनयान’ या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमेचा भाग असणारी पहिली मानवविरहित अंतराळ मोहीम डिसेंबर महिन्यात पार पडण्याची शक्यता असून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) त्यासाठी कंबर कसली आहे. ISRO’s first unmanned space mission in December, accelerated work

इस्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘‘ कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा मोठा तडाखा गगनयानला बसला आहे. यासाठी वापरण्यात येणारे हार्डवेअर वेगवेगळ्या ठिकाणांवरील कारखान्यांमध्ये तयार होतात. अनेक ठिकाणांवर लॉकडाउन असल्याने त्यांचा वेळेवर पुरवठा होऊ शकला नाही. देशभरातील जवळपास शंभरपेक्षाही अधिक कारखान्यांमधून यासाठीचे हार्डवेअर तयार करण्यात आले होते.’’



पृथ्वीच्या खालच्या कक्षेमध्ये मानवाला पाठवून तिथून त्याला सुरक्षितपणे माघारी आणण्याच्या सामर्थ्याचे दर्शन घडविण्यासाठी ‘गगनयान’ या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

कोरोनाच्या लॉकडाउनचा मोठा फटका अंतराळ कार्यक्रमाला बसला असून हार्डवेअर पुरवठ्यामध्ये त्यामुळे असंख्य अडचणी निर्माण झाल्या आहेत. मुख्य मोहीम असणाऱ्या गगनयानला बळ देण्यासाठी दोन मानवरहित मोहिमा आखण्यात येतील, यामुळे मानवी मोहिमेसाठीची मोर्चेबांधणी अधिक भक्कम होईल.

ISRO’s first unmanned space mission in December, accelerated work

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात