चीनी ड्रॅगनचे आणखी एक उत्तुंग यश, तीन अंतराळवीर अवकाश स्थानकात दाखल


विशेष प्रतिनिधी

बीजिंग : चीनने पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा त्यांच्या अंतराळवीरांना ‘तिआंगगाँग’ या नव्या अवकाश स्थानकाकडे रवाना केले. हे अंतराळवीर अवकाश स्थानकात पुढील तीन महिने राहणार आहेत. या मानवी मोहिमेचे नेतृत्व कमांडर नेई हायशेंग यांच्याकडे आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए)मधील हवाई दलातील ते वैमानिक आहेत. त्यांनी याआधीच्या दोन अंतराळ मोहिमांमध्ये भाग घेतला होता. अन्य दोन अंतराळवीरही चीनी सैन्यआदलातील सदस्य आहेत. China send 3 astronauts in space station

चीनचे शेन्झोऊ-१२ या अंतराळयानासह तीन अंतराळवीरांना घेऊन महाशक्तीशाली ‘लाँग मार्च -२एफ या रॉकेटने गोबी वाळवंटातील जिऊक्युआन उपग्रह उड्डाण केंद्रावरून उड्डाण केले. उड्डाणानंतर दहा मिनिटांत रॉकेट पृथ्वीच्याउ कक्षेत पोचल्यानंतर अंतराळयान त्यापासून वेगळे झाले. चीनने प्रथमच तीन अंतराळवीरांना अवकाशात पाठविले आहे.



‘शेन्झोऊ-१२’ अंतराळयान ‘तिआंगगाँग’चा मुख्य भाग असलेल्या ‘तिआने’शी जोडले गेले. या सर्व प्रक्रियेला साडेसहा तास लागले, अशी माहिती चीनी अवकाश संशोधन संस्था ‘चायनीज मॅन्ड स्पेस एजन्सी’ने दिली. चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष १ जुलै रोजी शताब्दी साजरी करणार असल्याने या उड्डाणाचे यश चीनसाठी प्रतिष्ठेचे आहे. तसेच अवकाश क्षेत्रात वर्चस्व निर्माण करण्यासाठी चीनेचे हे महत्त्वाचे पाऊल आहे, असे मानले जात आहे.

China send 3 astronauts in space station

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात