‘फ्लाईंग सिख’ मिल्खा सिंग यांचं निधन ; पत्नी पाठोपाठ घेतला जगाचा निरोप!


  • भारताचे महान ॲथलिट मिल्खा सिंग (Milkha Singh Passed away) यांचं कोरोनामुळं निधन झालं आहे. मिल्खा सिंग यांनी वयाच्या 91 व्या व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: भारताचे महान ॲथलिट मिल्खा सिंग (Milkha Singh Passed away) यांचं कोरोनामुळं निधन झालं आहे. मिल्खा सिंग यांनी  वयाच्या 91 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 20 मे  2021 रोजी मिल्खा सिंग यांना कोरोना संसर्ग झाला होता. चंदीगड येथील पीजीआई रुग्णालयात मिल्खासिंग यांनी शुक्रवारी रात्री (18 जून) अखेरचा श्वास घेतला. काही दिवसापूर्वी मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल कौर यांचं निधन झालं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिल्खासिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. Legendary Indian Sprinter Flying Sikh Milkha Singh Passed Away due to Corona at the age 91

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून मिल्खा सिंग यांना आदरांजली वाहिली आहे. मिल्खा सिंग यांच्या निधनामुळे आपण महान खेळाडूला मुकलो आहोत. त्यांनी देशाच्या असंख्य नागरिकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केलं होतं, असं नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांच्यासारखं प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून निघून जाणं ते फार दुख:द आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये मिल्खा सिंह यांच्याशी गेल्या काही दिवसांपूर्वीच बोलणं झालं होतं. ती चर्चा अखेरची असेल असं वाटलं नव्हतं, असं देखील मोदी म्हणाले.

मिल्खासिंग यांच्या जीवनावर चित्रपट मिल्खा सिंह यांच्या जीवनावर ‘भाग मिल्खा भाग’ या नावाचा चित्रपट देखील बनवण्यात आला होता. मात्र,चित्रपटात मिल्खा सिंह यांच्या जीवनातील थोडासाच संघर्ष दाखवण्यात आला होता. फ्लाईंग सिख या नावाने देखील ते प्रसिद्ध होते. मिल्खा सिंह यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला होता. मिल्खा सिंह यांनी 1968 कॉमनवेल्थ गेम्समध्ये विजेतेपद  मिळवलं होतं.  1960 च्या ऑलम्पिक स्पर्धेत ते चैौथ्या स्थानावर राहिले होते भाग घेतला होता.

Legendary Indian Sprinter Flying Sikh Milkha Singh Passed Away due to Corona at the age 91

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात