दहशतवाद्यांकडून हल्ल्यांसाठी ड्रोनचा वाढता वापर, भारताकडून आमसभेत चिंता


विशेष प्रतिनिधी

न्यूयॉर्क : जम्मूतील हवाई दलाच्या विमान तळावर दोन ड्रोन हल्ले झाले, त्या पार्श्वभूमीवर भारताने जागतिक व्यासपीठावर चिंता व्यक्त केली आहे. महत्त्वाच्या ठिकाणांवर दहशतवादी हल्ले करण्यासाठी ड्रोनचा वापर होण्याची शक्यता असून याकडे जागतिक समुदायाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे भारताने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत सांगितले.Terrorist increases drone use

गृह मंत्रालयाचे विशेष सचिव व्ही. एस. के. कौमुदी यांनी आमसभेत सांगितले की, ‘‘सध्या सोशल मीडियासह विविध प्रकारच्या माहिती आणि तंत्रज्ञानाचा दहशतवादी कारवायांसाठी, कट्टरतावाद पसरविण्यासाठी आणि युवकांची दिशाभूल करण्यासाठी वापर केला जात आहे.



आर्थिक व्यवहारांसाठीच्या नव्या डिजीटल माध्यमांचाही गैरवापर वाढला आहे. या सर्वांमध्ये आता ड्रोनद्वारे हल्ला करण्याची पद्धत वाढण्याची शक्यता आहे. ही बाब सर्वच देशांनी अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज आहे. ड्रोन बाजारात अत्यंत कमी दरांत आणि सहज उपलब्ध होत असल्याने दहशतवाद्यांकडून त्यांचा वापर वाढू शकतो.

जम्मूत झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर अधिक सावध झालेल्या भारतीय लष्कराने दोन संभाव्य ड्रोन हल्ले परतवून टाकले. पाकिस्तानमधील दहशतवादी भारतात हल्ले करण्यासाठी ड्रोनचा वापर करत असल्याचे यामुळे दिसून आले आहे.

Terrorist increases drone use

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात