After the announcement of free vaccination, the Chief Minister of Odisha thanked Prime Minister Modi

मोफत लसीकरणाच्या घोषणेनंतर ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींचे मानले आभार

free vaccination : पंतप्रधान मोदींनी देशातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज देशवासीयांना संबोधन केले. यावेळी पंतप्रधानांनी दोन महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. देशातील 18 वर्षांपुढील सर्वांसाठी 21 जूनपासून मोफत लसीकरण, तसेच देशातील 80 कोटी जनतेला नोव्हेंबरपर्यंत मोफत रेशनची घोषणा त्यांनी केली. पंतप्रधानांच्या या घोषणांनंतर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी ट्विटरद्वारे पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. After the announcement of free vaccination, the Chief Minister of Odisha thanked Prime Minister Modi  


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींनी देशातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज देशवासीयांना संबोधन केले. यावेळी पंतप्रधानांनी दोन महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. देशातील 18 वर्षांपुढील सर्वांसाठी 21 जूनपासून मोफत लसीकरण, तसेच देशातील 80 कोटी जनतेला नोव्हेंबरपर्यंत मोफत रेशनची घोषणा त्यांनी केली. पंतप्रधानांच्या या घोषणांनंतर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी ट्विटरद्वारे पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.

मुख्यमंत्री पटनायक म्हणाले की, प्रत्येकाचा जीव अमूल्य आहे. जोपर्यंत लसीकरण होत नाही, तोपर्यंत कुणीही सुरक्षित नाही. एक देश म्हणून आपण सर्व कोरोनाविरुद्ध लढ्यात उभे आहोत. लसीकरणाला राष्ट्रीय मोहीम केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार.

दरम्यान, मुख्यमंत्री पटनायक यांनी दोन दिवसांपूर्वीच सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून लसींची खरेदी केंद्राद्वारेच होऊ देण्याचे आवाहन केले होते. पटनायक म्हणाले की, त्यांनी काही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि आपली मते त्यांच्याशी शेअर केली. कोणतेही राज्य सुरक्षित नाही, जोपर्यंत लसीकरणावर जोर दिला जात नाही आणि जोपर्यंत त्यासाठी युद्धपातळीवर काम केले जात नाही.

ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले की, सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीत भारत सरकारने लस खरेदी करून त्याचे वितरण राज्यांना केले पाहिजे जेणेकरून आपल्या नागरिकांना लवकरात लवकर लस मिळेल. ते पुढे म्हणाले होते की, लसीकरण कार्यक्रम राज्यांकडे सोपवला पाहिजे जेणेकरून ते त्यांच्या पातळीवर यंत्रणेचा वापर करून लोकांपर्यंत लसी पोहोचवतील.

After the announcement of free vaccination, the Chief Minister of Odisha thanked Prime Minister Modi

महत्त्वाच्या बातम्या