याआधी जेडीयूने अरुणाचल प्रदेशमधूनही आपला एक उमेदवार जाहीर केला होता. split in the front INDIA Announcement of candidate by Kejriwal without allotment of seats
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुक 2024 साठी विरोधी पक्षांच्या सुरू असलेल्या प्रयत्नांदरम्यान, आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमधील भरूच मतदारसंघातून त्यांच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे.
गुजरातमधील डेडियापाडा विधानसभा मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे आमदार चैत्रा वसावा भरूचमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केजरीवाल यांनी नेत्रंग येथील एका जाहीर सभेत केली.
चैत्रा वसावा हे सध्या वनविभागाशी संबंधित एका गुन्ह्यात तुरुंगात आहे. याआधी जेडीयूने अरुणाचल प्रदेशमधूनही आपला एक उमेदवार जाहीर केला होता.
सभेला संबोधित करताना केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, आदिवासी समाजाचे नेते चैत्रा वसावा यांना भाजपने अटक केली आहे. ते आमच्या धाकट्या भावासारखे आहेत. पण सर्वात दुःखाची बाब म्हणजे त्यांच्या पत्नीलाही अटक करण्यात आली. शकुंतला बेन चैत्र वसावा यांची पत्नी असली तरी ती आमच्या समाजाची सून आहे. ही संपूर्ण आदिवासी समाजाचा अवमान करणारी बाब आहे. असं ते म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App