इंडिया आघाडीच्या मुंबईतल्या बैठकीपूर्वी सोनिया गांधींची काश्मीरच्या नागिन झीलमध्ये बोटीतून सैर; राहुल गांधीही पोहोचणार!!


वृत्तसंस्था

श्रीनगर : मोदी विरोधकांच्या “इंडिया” आघाडीची मुंबईत 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर अशी बैठक होत असताना त्यापूर्वी काँग्रेस संसदेच्या नेत्या सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी जम्मू काश्मीरचा दौरा करत आहेत. येथे ते हाऊसबोट मध्ये विश्रांती घेणार आहेत. Sonia Gandhi’s boat trip in Kashmir’s Nagin Lake before the All India meeting in Mumbai

पण राहुल गांधी पोहोचण्यापूर्वी सोनिया गांधींनी श्रीनगर मध्ये पोहोचून नागिन झीलमध्ये बोटिंगचा आनंद लुटला. लवकरच राहुल गांधी श्रीनगर मध्ये दाखल होऊन सोनिया गांधीं समावेत दोन दिवसांची सुट्टी आणि विश्रांती घेणार आहेत.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारातून मुंबईमध्ये मोदीविरोधकांच्या “इंडिया” आघाडीची बैठक होत आहे. त्यापूर्वी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी जम्मू काश्मीरचा सुट्टी दौरा आयोजित केला आहे. यातच सोनिया गांधींनी श्रीनगरच्या सुप्रसिद्ध नागिन झीलमध्ये बोटिंगचा आनंद लुटला. या दौऱ्यावरून दिल्लीत परत आल्यानंतर हे दोन्ही नेते मुंबईत “इंडिया” आघाडीच्या बैठकीत सामील होणार आहेत तेथे मोदीविरोधातली पुढची रणनीती ठरवून इंडिया आघाडीचा आघाडीच्या लोगोचेही अनावरण सोनिया गांधींच्या हस्ते होणार आहे.

केंद्र सरकार मधल्या भ्रष्टाचारामुळे बदनाम झालेले “यूपीए” हे नाव टाकून काँग्रेस प्रणित आघाडीने “इंडिया” हे नवे नाव धारण केल्यानंतर या आघाडीची मुंबईत होणारी ही तिसरी बैठक आहे. पण त्यापूर्वी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी सुट्टी एन्जॉय करण्याकरता जम्मू कश्मीर मधल्या नागिन झीलची निवड केल्याने सोशल मीडियात त्यावरती टीका टिपण्णी होत आहे.

Sonia Gandhi’s boat trip in Kashmir’s Nagin Lake before the All India meeting in Mumbai

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात विठ्ठल रखुमाईला शोभुनी दिसतो तिरंगा!