संजय राऊत म्हणाले, योगी आदित्यनाथांच्या विरोधात म्हणून नव्हे तर अयोध्येत लढणार शिवसेना


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात म्हणून नव्हे तर अयोध्येतून लढायचे म्हणून शिवसेना लढणार आहे. कोणत्याही पक्षासोबत शिवसेना युती करणार नाही, असे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.Sanjay Raut said, Shiv Sena will fight in Ayodhya not against Yogi Adityanath

राऊत म्हणाले, आम्ही अयोध्या आणि मथुरा येथेही निवडणूक लढवित आहोत. पण योगी आदित्यनाथ येथून लढताहेत म्हणून आम्ही लढत नाही. योगी आदित्यनाथ हे मोठे नेते आहेत. ते कोठूनही निवडणूक लढवू शकतात. आम्ही त्यांचा सन्मान करतो. आमचा कोणा एका व्यक्तीशी संघर्ष नाही.



उत्तर प्रदेशात आपण कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही असे सांगून राऊत म्हणाले, आपण पश्चिम उत्तर प्रदेशचा दौरा करत आहोत. आम्ही भाजपा, कॉँग्रेस, समाजवादी पक्ष कोणा बरोबरही युती करणार नाही. कारण समाजवादी पक्षापेक्षा आमची विचारधारा भिन्न आहे.

आत्तापर्यंत आम्ही उत्तर प्रदेशात निवडणुका लढविल्या नाहीत कारण भाजपचे नुकसान व्हायला नको. कारण आम्हा दोघांची विचारधारा एकच आहे. पण आता आम्हाला उत्तर प्रदेशात परिवर्तन घडवायचे आहे. आम्ही अयोध्या आंदोलनाचा एक भाग होतो. आम्ही मथुरेसाठी आंदोलन करू.

आपण उत्तर प्रदेशात गेल्यावर शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेणार असल्याचे सांगताना राऊत म्हणाले, आम्ही त्यांच्या डोळ्यातील अश्रू आंदोलन काळात आणि आंदोलन यशस्वी झाल्यावरही पाहिले आहेत. त्यांनी शेतकऱ्यांसाठीची लढाई जिंकली आहे. त्यांची भेट घेऊन विचार ऐकून घेणार आहे. त्यांना काय वाटते हे समजून घेणार आहे.

Sanjay Raut said, Shiv Sena will fight in Ayodhya not against Yogi Adityanath

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात