समाजावादी पक्षाकडून पाकिस्तानचे समर्थन घोषणा, सायकल का बटन दबाना है, नया पाकिस्तान बनाना हैच्या निर्लज्ज घोषणा


विशेष प्रतिनिधी

कानपुर : कानपूरमध्ये समाजवादी पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारादरम्यान पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. य् समाजवादी पक्षाचे बिठूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मुनींद्र शुक्ला यांनी टिकरा भागात प्रचार फेरी काढली.Samajwadi Party support for Pakistan,

त्यात कार्यकर्त्यांनी ‘सायकल का बटन दबाना है, नया पाकिस्तान बनाना है’ अशा घोषणा दिल्या. याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला.हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर उत्तर प्रदेश पोलीसांनी चौकशी सुरू केली आहे. मुनींद्र शुक्ला यांच्या दौºयात हा प्रकार घडला.



यावेळी मोहरा मारो तानके, सायक को पहचान के अशा घोषणा दिल्या जात होत्या. याच दरम्यान अचानक ढोल ताशांच्या गजरात पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या जाऊ लागल्या. कानपूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. व्हिडीओची तपासणी होत आहे.

भाजपने आरोप केला आहे की समाजवादी पक्षाचे पाकिस्तान प्रेम लपून नाही. यापूर्वीही अखिलेश यादव यांनी पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांचे कौतुक केले होते.

समाजवादी पक्षाने मात्र हा व्हिडीओ एडिट केला असल्याचा आरोप केला आहे. समाजवादी पक्षाला बदनाम करण्याचे षडयंत्र आखण्यात आले आहे, असे म्हटले आहे.विधानसभेच्या २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत मुनींद्र शुक्ला यांचा विजय झाला होता. २०१७ मध्ये भाजपचे अभिजीत सांगा यांनी शुक्ला यांचा पराभव केला होता.

Samajwadi Party support for Pakistan,

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात