नाशिक : राहुल गांधींची विरोधी पक्षनेते पदाची दोन वर्षे आज पूर्ण झाली त्याबद्दल त्यांनी स्वतः आपल्या कामगिरीचे मोजमाप केले. त्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर लेख लिहून त्यात ग्राफिक सुद्धा सादर केले. Rahul Gandhi
देशभर राजकीय भ्रमंती
राहुल गांधींनी लोकसभेतले विरोधी पक्ष नेते म्हणून गेल्या दोन वर्षांमध्ये अत्यंत प्रभावी कामगिरी केली, असे त्यांचे म्हणणे पडले. या दोन वर्षांच्या काळात राहुल गांधींनी जनतेचे प्रश्न लोकसभेत तर मांडलेच, पण त्यापलीकडे जाऊन संपूर्ण देशभर त्यांची राजकीय भ्रमंती राहिली.
आकडे बोलले
या कालावधीत त्यांनी वोट चोरी, जातिगत जनगणना, संविधानातील बदल हे मुद्दे उपस्थित केलेच, पण त्या पलीकडे जाऊन त्यांनी 25 राज्यांचे दौरे केले. 162 जनसभांना संबोधित केले. 42 संसदीय भाषणे केली. जनसंवादाचे 213 कार्यक्रम केले. 62 पत्रकार परिषदांना संबोधित केले 70 अधिकृत कार्यक्रम केले. काँग्रेस पक्षासाठी 187 कार्यक्रम घेतले. राहुल गांधींनी दोन वर्षांमध्ये एवढी प्रचंड कामगिरी केली, की त्यांनी स्वतःहून आपल्याच कामगिरीची याची दखल घेतली. राहुल गांधींनी स्वतःहून ही आकडेवारी सोशल मीडिया हँडलवर सादर केली.
भाजपला हरविण्यात अपयश
पण याच दोन वर्षांच्या दरम्यान हरियाणा, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, पुदुचेरी आदी राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या. त्या विधानसभा निवडणुकांमध्ये मात्र राहुल गांधींना काँग्रेस पक्ष सत्तेवर आणण्यात अपेक्षित यश मिळाले नाही. यामध्ये केरळचा अपवाद राहिला. पण केरळ राज्यामध्ये सुद्धा राहुल गांधींना कम्युनिस्ट पार्टीच्या राजवटीचा पराभव करावा लागला. राहुल गांधी एकाही विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कामगिरीत भाजपचा पराभव करण्यात आलेल्या अपयशाची मोठी उणीव राहिली. पण त्यांनी लोकसभेतले विरोधी पक्षनेते म्हणून प्रभावी कामगिरी करण्याचा भरपूर प्रयत्न केला, हे त्यांनीच सादर केलेल्या आकडेवारी मधून दिसून आले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App