UP Election 2022 : प्रियांका गांधींची मोठी घोषणा, उत्तर प्रदेशात सत्ता आल्यास मुलींना देणार स्मार्टफोन आणि स्कूटी


उत्तर प्रदेश पक्ष प्रभारी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी यूपी निवडणुकीच्या तोंडावर एक मोठी घोषणा केली आहे. प्रियांका गांधी म्हणाल्या की, जर त्यांचा पक्ष सत्तेत आला तर मुलींना स्मार्टफोन आणि इलेक्ट्रिक स्कूटी देण्यात येईल. निवडणुकीपूर्वी त्यांनी राज्यातील मुलींना हे वचन दिले आहे.priyanka gandhi announces to give smartphones and scooties for girls after getting power in up


वृत्तसंस्था

लखनऊ : उत्तर प्रदेश पक्ष प्रभारी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी यूपी निवडणुकीच्या तोंडावर एक मोठी घोषणा केली आहे. प्रियांका गांधी म्हणाल्या की, जर त्यांचा पक्ष सत्तेत आला तर मुलींना स्मार्टफोन आणि इलेक्ट्रिक स्कूटी देण्यात येईल. निवडणुकीपूर्वी त्यांनी राज्यातील मुलींना हे वचन दिले आहे.

गुरुवारी त्यांनी यासंदर्भात एक ट्विटही केले होते. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, “काल मी काही विद्यार्थिनींना भेटले. त्यांनी सांगितले की, त्यांना वाचन आणि सुरक्षिततेसाठी स्मार्टफोनची आवश्यकता आहे. मला आनंद होत आहे की, आज घोषणा समितीच्या संमतीने यूपी काँग्रेसने निर्णय घेतला आहे की,



सरकार स्थापन झाल्यास इंटर पास मुलींना स्मार्टफोन आणि पदवीधर मुलींना इलेक्ट्रॉनिक स्कूटी देण्यात येतील.” काँग्रेसकडून हे मोठे पाऊल मानले जात आहे. यापूर्वी प्रियांका गांधींकडून यूपीमध्ये महिलांना 40 टक्के तिकिटे देण्याची घोषणा करण्यात आली होती.

बिहारमध्येही मुलींसाठी योजना सुरू

दरम्यान, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी बिहार सरकार आधीपासूनच मुख्यमंत्री कन्या उत्थान योजना (MKUY) राबवत आहे. त्याअंतर्गत मिळणारी रक्कम आता सरकारने दुप्पट केली आहे. यापूर्वी इंटर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींना शासनाकडून 10 हजार रुपये आणि पदवी किंवा समकक्ष पदवी पूर्ण केल्यानंतर 25 हजार रुपये दिले जात होते.

पण आता इंटर पास करणाऱ्या मुलींना 25 हजार रुपये मिळतील आणि पदवी किंवा समकक्ष पदवी पूर्ण केल्यावर 50 हजार रुपये देण्यात येतील. त्याच वेळी, दरवर्षी 12वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना सायकल, ड्रेस आणि शिष्यवृत्ती योजनेंतर्गत रक्कम दिली जाते.

priyanka gandhi announces to give smartphones and scooties for girls after getting power in up

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात