बेपत्ता परमवीर सिंग चंदीगडमध्ये? ‘पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी’मुळे संशय बळावला!; आयोगासमोर काही सांगायचे नाही


विशेष प्रतिनिधी

मुंबई : ठाकरे – पवार सरकारमधील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग हे गेल्या गायब आहेत. न्यायालयात सुनावणीसाठी ते येत नसल्यामुळे आणि तपास यंत्रणांसमोर चौकशीसाठी हजर होत नसल्यामुळे ते फरार असल्याचा संशय आहे. यासंदर्भात राज्य सरकारने नेमलेल्या निवृत्त न्यायमूर्ती चंडीवाल आयोगासमोर सुनावणी सुरू असताना त्यांच्या वकिलांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले असून त्यासोबत जोडण्यात आलेल्या पॉवर ऑफ अ‍ॅटर्नीमुळे परमवीर सिंग यांचा ठावठिकाणा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ते चंदीगडमध्ये असल्याची चर्चा आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातली बातमी दिली आहे. Parambir singh in chandigarh hints power of attorney affidavit chandiwal commission

परमवीर सिंग यांनी केलेल्या घोटाळ्यांच्या आरोपांनंतर त्यांच्या विरोधात देखील अनेक आरोप झाले आहेत. यासंदर्भात निवृत्त न्यायमूर्ती कैलास उत्तमचंद चंडीवाल यांच्या आयोगासमोर सुरू असलेल्या सुनावणीसाठी सातत्याने विचारणा करून देखील ते उपस्थित राहिले नसल्यामुळे ते नेमके कुठे आहेत? याविषयी चर्चा सुरू आहे.



प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत परमवीर सिंग सातत्याने सुनावणीसाठी गैरहजर राहात आहेत. सीबीआयकडून देखील सुरू असलेल्या तपासासाठी ते उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांच्या ठावठिकाण्याविषयी वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. मात्र, अशातच परमवीर सिंग यांनी त्यांचे वकील अभिनव चंद्रचूड यांच्यामार्फत प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. या प्रतिज्ञापत्रासोबत त्यांनी तयार केलेल्या “पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी”मुळे त्यांचा ठावठिकाणा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

परमवीर सिंग यांनी ही “पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी” चंदीगडमध्ये तयार केली आहे. कागदपत्रांवर पत्ता चंदीगडचाच असल्याने ते चंदीगढमध्येच असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. महेश पांचाल या व्यक्तीच्या नावे परमवीर सिंग यांनी ही “पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी” बनवली असून आपल्या ऐवजी महेश पांचाल न्यायालयीन आयोगासमोर सुनावणीसाठी उपस्थित राहतील, असे त्यांनी त्यात म्हटले आहे.

“आयोगासमोर काहीही सांगायचं नाही”

परमवीर सिंग यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांना आयोगासमोर काहीही सांगायचे नसल्याचे नमूद करण्यात आलं आहे. “परमवीर सिंग यांच्याकडे कोणताही युक्तीवाद किंवा प्रतिवाद करण्यासाठी कोणतेही पुरावे नसून त्यांना आयोगासमोर काहीही मत मांडायचं नाही, असे या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

Parambir singh in chandigarh hints power of attorney affidavit chandiwal commission

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात