वृत्तसंस्था
नवी दिल्ली : सध्या सणासुदीचा काळ असल्याने सोने खरेदी अर्थात दागदागिने खरेदी केले जातात. पण, ते महाग आणि सांभाळत बसायचा ताप असतो. कागदोपत्री बॉन्डच्या स्वरुपात असे सोने खरेदीची संधी मोदी सरकारने आणि तेही बाजारभावापेक्षा कमी दरात दिली आहे. २५ ऑक्टोबरपासून ही योजना सुरु होत आहे. Opportunity to buy cheap gold from October 25; Modi goverments Sovereign Gold Bond Scheme 2021-22 – Series-VII)
तुम्ही आता फिजिकल गोल्डपेक्षा डिजिटल गोल्डमध्ये सहज गुंतवणूक करू शकता. मोदी सरकार तुम्हाला स्वस्तात सोनंखरेदीची संधी लवकरच उपलब्ध करून देणार आहे. २५ ऑक्टोब पासून सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीमची सातवी सीरिज सुरू होत आहे. ही योजना फक्त पाच दिवसांसाठी (२५ ते२९ ऑक्टोबर) खुली असणार आहे. या काळात गुंतवणूकदारांना बाजारपेठेपेक्षा कमी दराने सोने खरेदी करण्याची संधी मिळेल. सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीम सरकारच्या वतीने RBI द्वारे जारी केला जातो.
ऑनलाइन खरेदीवर मिळेल सूट हे बाँड खरेदी करण्यासाठी ऑनलाइन प्रणालीचा वापर केल्यास तुम्हाला आणखी सूट मिळणार आहे. सोनेखरेदीसाठी ऑनलाइन अर्ज आणि पेमेंट केल्यास गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम ५० रुपयांची सूट देखील मिळेल. कुठे करता येईल खरेदी? कोणतीही व्यक्ती, हिंदू अविभाजित परिवार (HUF), ट्रस्ट, विद्यापीठ आणि धर्मसंस्था बाँडच्या सदस्यत्वासाठी अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. तुम्ही सर्व कमर्शिअल बँका (आरआरबी, लघू वित्त बँक व्यतिरिक्त), स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, निवडण्यात आलेले पोस्ट आणि एनएसई तसच बीएसईच्या माध्यमातून याची खरेदी करू शकता.
सरकारकडून आरबीआयच्या ( Reserve Bank of India RBI) माध्यमातून हे सॉव्हरेन गोल्ड बाँड जारी केले जातात. या स्कीममध्ये एका आर्थिक वर्षात एखादी व्यक्ती जास्तीत जास्त ४ किलो तर कमीत कमी १ ग्रॅम गोल्ड बाँडची खरेदी करू शकते. शिवाय ट्रस्ट किंवा यासारख्या संस्था जास्तीत जास्त २० किलो बाँडची खरेदी करू शकतात. याकरता जारी होणारे अर्ज १ ग्रम किंवा त्याच्या पटीमध्ये असतात.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more