काश्मिरी नागरिकांना सुरक्षा देण्याची प्रियांका गांधींची मागणी, पीडीपीकडून राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – काश्‍मीरमध्ये गेल्या दोन दिवसांत पाच जणांची हत्या झाली आहे. काल शाळेवरच हल्ला करून दहशतवाद्यांनी दोन शिक्षकांना गोळ्या घालून ठार केले. या घटनेमुळे संतापाची लाट उसळली असून राजकीय पक्षांकडून हल्ल्याचा निषेध केला जात आहे. कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.priyanka gadhi backs kashmiri people

प्रियांका गांधी म्हणाल्या, की दहशतवाद्यांकडून काश्मियरी नागरिकांवर होणारे हल्ले हृदयद्रावक आणि निंदनीय आहेत. सध्याच्या कठिण काळात आम्ही काश्मीनरी बहिण-भावंडासमवेत आहोत. केंद्र सरकारने तातडीने पावले उचलत नागरिकांच्या सुरक्षेकडे लक्ष देण्याची गरज आहे. राहुल गांधी यांनी देखील हल्ल्याचा निषेध केला आहे.आपण पीडित कुटुंबाच्या दु:खात सहभागी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कलम ३७० हटवण्याच्या निर्णयावर त्यांनी प्रश्नसचिन्ह उपस्थित केले आहेत. काश्मीहरात हिंसाचार वाढत चालला आहे. खोऱ्यातील दहशतवाद हा नोटाबंदीने थांबला नाही ना कलम ३७० वगळल्याने. केंद्र सरकार काश्मी री नागरिकांना सुरक्षा देण्यास अपयशी ठरल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.

दरम्यान, काश्मीयरमधील वाढत्या हत्येच्या घटनांमुळे पीडीपीने नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. लोकांना सुरक्षा पुरवण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप पीडीपीने केला आहे.

priyanka gadhi backs kashmiri people

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर