विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : मायक्रोवेव्हमध्ये प्लॅस्टिक भांडी नकोच


सध्या अनेक घरांत मायक्रोवेव्हचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. अशावेळी यात पदार्थ शिजवताना प्लॅस्टिकच्या भांड्याचा उपयोग होतो व त्यामुळे थॅलेट्‌स हा प्लॅस्टिकचा लवचिकपणा वाढवणारा घटक वेगळा होऊन अन्नामध्ये मिसळतो. प्लॅस्टिकची काही भांडी मायक्रोवेव्हमध्ये वापरासाठी बनवलेली नसतात. मायक्रोवेव्हचे तापमान शंभर अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यास त्यातील घातक रसायने पदार्थात उतरतात असे वॉशिंग्टन विद्यापीठातील फूड इंजिनिअरिंगच्या प्राध्यापकांच्या संशोधनात पुढे आले आहे.Do not discard plastic utensils in the microwave

संशोधकांनी 2011मध्ये पदार्थ साठविण्यासाठीच्या 400 विविध भांड्यांचा अभ्यास केला असता, त्यातील बहुतांश भांड्यांतून हार्मोन्सचे संतुलन बिघडवणारी रसायने बाहेर पडत असल्याचे आढळले. थॅलेट्‌समुळे लहान मुलांना रक्तदाब व मधुमेहाचा धोका असतो. प्लॅस्टिकमध्ये बिस्फेनॉल मोठ्या प्रमाणात वापरले जाते व त्यामुळेही हार्मोन्सचे संतुलन बिघडते. ऍरिझोना विद्यापीठातील संशोधकांच्या मते, मायक्रोवेव्हच्या वापराने पदार्थातील दूषित घटक वाढतात.

प्लॅस्टिकमध्ये अन्न शिजवण्याबरोबरच भांड्यावर ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या झाकणामुळेही घातक रसायने पदार्थांत मिसळतात. त्यामुळे प्लॅस्टिकऐवजी मायक्रोवेव्हसाठी सुरक्षित भांडीच वापरावीत. आकार बदलत असलेली किंवा जुनी भांडी मायक्रोवेव्हमध्ये वापरू नयेत, तसेच भांड्याच्या खाली व्ही किंवा पीव्हीसी लिहिलेले व 3 हा क्रमांक लिहिलेली भांडी पदार्थात थॅलेट्‌स सोडत असल्याने ती वापरू नयेत. जॉर्जिया विद्यापीठातील संशोधकांच्या मते, प्लॅस्टिकप्रमाणेच मायक्रोवेव्हमध्ये उच्च तापमान आणि असमान भाजण्यानेही धोके निर्माण होतात.

त्यामुळे मायक्रोवेव्हचा उपयोग पदार्थ शिजवण्याऐवजी शिजवलेला पदार्थ पुन्हा गरम करण्यासाठीच करावा. पदार्थ केवळ एकदाच व 82 अंश सेल्सिअस तापमानाला गरम करावा व पुनःपुन्हा तसे करू नये. कडधान्ये व बटाट्यासारखे स्टार्चचे प्रमाण अधिक असलेले पदार्थ मायक्रोवेव्हमध्ये शिजवल्यास ऍक्रालामाइडसारखे कर्करोगाचा धोका निर्माण करणारे रसायन तयार होण्याचा धोकाही असतो. त्यासाठी बटाटे काही वेळ पाण्यात भिजवून मायक्रोवेव्हमध्ये ठेवणे हा पर्याय आहे. एकंदरीतच, मायक्रोवेव्हमधील इलेक्ट्रोहमॅग्नेटिक लहरी घातक नाहीत, मात्र त्यात अप्रमाणित प्लॅस्टिकचा वापर आणि अतिरिक्त तापमान या गोष्टी घातक असल्याचे सिद्ध होते. तेव्हा मायक्रोवेव्हचा वापर तारतम्याने करणेच योग्य.

Do not discard plastic utensils in the microwave

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण