कुस्तीगीरांचे फक्त दावे, ब्रजभूषण सिंहांच्या विरोधात पुरावेच नाहीत; दिल्ली पोलिसांची माहिती


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतीय कुस्तीगीर महासंघाचे मावळते अध्यक्ष खासदार ब्रजभूषण सिंह यांच्यावर कुस्तीगीरांनी लैंगिक छळाचे आरोप केले असले तरी प्रत्यक्षात त्यांना अटक करण्याएवढे पुरावेच पोलिसांकडे नाहीत, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली आहे. Only the claims of the wrestlers, Brajbhushan singh is not the evidence against

ब्रजभूषण सिंह यांच्याविरुद्ध ऑलिम्पिक पदक विजेत्या कुस्तीगीर साक्षी मलिक, विनेश फोगट भगिनी यांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले. त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केले. त्यांच्याविरुद्ध बाललैंगिक छळ गुन्हेगारी विरोधात पोस्को कायद्यांतर्गत देखील गुन्हा दाखल केला.

परंतु या कुस्तीगीरांनी त्यांच्या विरोधात कोणतेही पुरावे सादर केले नाहीत. दिल्ली पोलिसांनी या संदर्भात चौकशी आणि तपास केला. या चौकशी आणि तपासावर सुप्रीम कोर्टाची निगराणी आहे. त्यामुळे पोलिसांना सुप्रीम कोर्टाला पुढे येत्या 15 दिवसांत अहवाल सादर करावा लागणार आहे.

कुस्तीगीरांनी ब्रजभूषण सिंह यांच्याविरुद्ध फक्त आरोप केले आहे. त्यांच्या विरोधात पुरेसे पुरावे दिले नाहीत. तसेच चौकशी आणि तपासात देखील ब्रजभूषण सिंह यांना अटक करण्याएवढे पुरावे आढळले नाहीत, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे.

Only the claims of the wrestlers, Brajbhushan singh is not the evidence against

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात