मोदी सरकारच्या ९ वर्षांत देशाच्या संरक्षण निर्यातीत तब्बल २३ पटीने वाढ, ८५ देशांना विकली शस्त्रास्त्रे!


संरक्षण निर्यात आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळवीर पोहचली निर्यात

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशाच्या संरक्षण निर्यातीत प्रचंड वाढ झाली असून ती आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. गेल्या ९ वर्षात देशाच्या संरक्षण निर्यातीत २३ पट वाढ झाली आहे. २०१३-१४ मध्ये भारताची संरक्षण निर्यात ६८६ कोटी होती. २०२२-२३ मध्ये ती १६ हजार कोटींपर्यंत वाढली आहे. In the 9 years of the Modi government the countrys defense exports increased by 23 times weapons were sold to 85 countries

संख्या दर्शविते की जागतिक स्तरावर भारत संरक्षण सामग्री निर्मितीमध्ये आपली भूमिका सतत वाढवत आहे. सध्या भारत ८५ हून अधिक देशांमध्ये संरक्षण सामग्रीची निर्यात करत आहे. यासोबतच देशातील १०० हून अधिक कंपन्या त्यांच्या संरक्षण उत्पादनांची जगभरात निर्यात करत आहेत. यामध्ये प्रगत हलकी हेलिकॉप्टर, क्षेपणास्त्रे, तोफखाना, पिनाका रॉकेट आणि लाँचर आणि डार्नियर्स सारखी अनेक शस्त्रे यांचा समावेश आहे.

‘तेजस’ची निर्यात करू शकतो भारत –

भारत लवकरच इजिप्त आणि अर्जेंटिनाला तेजस लढाऊ विमानांची निर्यात करू शकतो. सध्या भारत श्रीलंका, फ्रान्स, रशिया, मालदीव, इस्रायल, नेपाळ, सौदी अरेबिया आणि पोलंड यांसारख्या अनेक देशांना शस्त्रे विकतो.

स्वदेशी रचना आणि उत्पादनावर केंद्राचा भर  –

संरक्षण निर्यातीतील तेजीचे कारण केंद्र सरकारची सध्याची धोरणे आहेत. या अंतर्गत, देशात संरक्षण उत्पादनात स्वदेशी डिझाइन आणि उत्पादनावर खूप भर देण्यात आला आहे.

२०२५पर्यंत वार्षिक ३५ हजार कोटींचे लक्ष्य –

२०२५ च्या अखेरीस वार्षिक ३५ हजार कोटी रुपयांच्या संरक्षण निर्यातीचे लक्ष्य गाठण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. हेच कारण आहे की काही वर्षांपूर्वीपर्यंत भारत हा जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र खरेदीदार देश म्हणून ओळखला जात होता, परंतु आज भारताची गणना जगातील अव्वल २५ शस्त्रास्त्र निर्यात करणाऱ्या देशांमध्ये केली जाते.

In the 9 years of the Modi government the countrys defense exports increased by 23 times weapons were sold to 85 countries

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात