तब्बल 53 वर्षांनी निळवंडे धरणाचे पाणी शेतातून खळाळणार!!; शिंदे – फडणवीसांच्या हस्ते चाचणी शुभारंभ

प्रतिनिधी

अहमदनगर :अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निळवंडे धरणातून पाणी सोडण्याच्या प्रथम चाचणीचा शुभारंभ सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलपूजन केल्यानंतर कळ दाबून निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी प्रवाहीत करण्यात आले. After 53 years, the water of Nilavande Dam will flow from the farm

आजचा दिवस हा या भागातील शेतकऱ्यांचा आयुष्यातील अत्यंत आनंदाचा दिवस असून तब्बल ५३ वर्षांनी इथल्या शेतामध्ये धरणातील पाणी खळाळणार असल्याने हा दिवस आनंदाचा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. राज्यात युती सरकार अस्तित्वात आल्यापासून २९ ते ३० प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन ६ लाखांहून अधिक हेक्टर जमीन ओलिताखाली आणली असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.

राज्यातील युती सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारे अनेक निर्णय घेतले असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, तो सुखी समाधानी व्हावा यासाठी हे निर्णय घेण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना नमो कृषी सन्मान योजनेतून ६ हजार रुपये देणे असो, १ रुपयात पीकविमा काढणे असो, सातत्याने पडणारा पाऊस नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर करणे असो किंवा एनडीआरएफचे निकष बदलून २ ऐवजी ३ हेक्टर जमिनीला मदत करणे असो अशा अनेक निर्णयांचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे.

निळवंडे धरणाचे पाणी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी ५३ वर्षे वाट पहावी लागली, या लढ्याला पिचड साहेबानी सहकार्य केले, खासदार सदाशिव लोखंडे यांनी त्यासाठी अनेक आंदोलने केली. तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यासाठी शासकीय स्तरावर पाठपुरावा केला त्यामुळे हे यश सर्वांचे असल्याचे मनोगत यासमयी बोलताना व्यक्त केले.

यावेळी निळवंडे धरण कृती समितीच्या वतीने माझा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, माजी आमदार शिवाजीराव कर्डीले, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हाधिकारी सिद्धराम शालीमठ, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेशकुमार ओला उपस्थित होते.

After 53 years, the water of Nilavande Dam will flow from the farm

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात