‘’मी एकदिवस पंतप्रधान होऊन…’’ ‘रासप’चे अध्यक्ष महादेव जानकर यांचं जाहीर विधान

RSP Leader Mahadev Jankar Called Chakkajam Agitation On Sunday Over OBC Reservation

शिरूर येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते.

विशेष प्रतिनिधी

शिरूर : माजी मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांचं एक मोठं विधान समोर आलं आहे. मी एकदिवस पंतप्रधान होऊन शिरुरला हेलिकॉप्टरमधून येईन, असा विश्वास  जानकरांनी शिरूर येथे आयोजित राष्ट्रीय समाज पक्षाच्या मेळाव्यात केला आहे. रासपचे  शिरूर तालुकाध्यक्ष शिवाजीराव कुऱ्हाडे यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते, याप्रसंगी  मोठ्यासंख्येने कार्यककर्ते  व नागरिकांची उपस्थिती होती. One day I will become Prime Minister and come to Shirur by helicopter Statement of  President Mahadev Jankar

याप्रसंगी  जानकर म्हणाले, आपल्या मुलांनी खासदार, आमदार व्हायला हवं.  एमपीएससी, यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण  होऊन आयपीएस, जिल्हाधिकारी, एसपी, वरिष्ठ अधिकारी व्हायला हवं. मंत्री म्हणून काम करताना, जनतेच्या हितासाठी धोरणं  राबवताना मंत्रालयातील अधिकारी मोठी अडचण निर्माण करतात.

आपल्या मुलांनी उच्च शिक्षण  घेतले पाहिजे,  तरच सर्वसामान्य  जनता असो  किंवा शेतकरी, कष्टकरी यांना न्याय देण्याची भूमिका घेता येईल. महाराष्ट्रातील मुलांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी त्यांची  दिल्लीत सर्व व्यवस्था करणार असल्याचे म्हणत, आपणही पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहत आहे आणि हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार असून, याच शिरूरला लवकरच हॅलिकॉप्टरमधून येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

One day I will become Prime Minister and come to Shirur by helicopter Statement of   Mahadev Jankar

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात