वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Pannu खलिस्तानी दहशतवादी आणि शीख फॉर जस्टिस (SFJ) प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नूने एक नवीन व्हिडिओ जारी केला असून अयोध्येतील राम मंदिरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिली आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये हा दावा करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये तो राम मंदिराला लक्ष्य करण्याबाबत बोलत आहे.Pannu
कॅनडातील भारतीय वंशाचे हिंदू खासदार चंद्रा आर्य यांनाही पन्नू यांनी धमकी दिली आहे. पन्नूने व्हिडीओ जारी करून म्हटले की, अयोध्येच्या राम मंदिरात 16 आणि 17 नोव्हेंबरला हिंसाचार होणार आहे. दिव्य मराठी या व्हिडिओला दुजोरा देत नाही.
हिंदुत्व विचारसरणीची जन्मभूमी असलेल्या अयोध्येचा पाया आम्ही हादरवून टाकू, असेही दहशतवादी पन्नूने व्हिडिओमध्ये म्हटले आहे. व्हिडिओमध्ये पन्नूने अयोध्येतील राम मंदिरासह देशातील अनेक हिंदू मंदिरांची छायाचित्रे समाविष्ट केली आहेत. या व्हिडिओला मोठा धोका म्हणून पाहिले जात आहे.
व्हिडिओमध्ये पन्नू म्हणाले- कॅनडाप्रती प्रामाणिक राहा किंवा देश सोडून जा
दहशतवादी पन्नू व्हिडिओमध्ये म्हणाला – भारतीय वंशाचे अनेक कॅनेडियन पीएम मोदींच्या विचारसरणीचे पालन करतात. तसेच कॅनडाचे खासदार चंद्रा आर्य हे हिंदू दहशतवादाचा चेहरा आहेत. तुम्ही एकतर कॅनडाशी प्रामाणिक राहा किंवा कॅनडाची माती सोडा. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आणि कॅनडाच्या पोलिसांनी (RCMP) आधीच म्हटले आहे की प्रो खलिस्तानी शीख नेता हरदीपसिंग निज्जरची हत्या भारतानेच केली होती. यात भारतीय मुत्सद्दींचा हात होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App