Shivani wadettiwar वडेट्टीवारांच्या लेकीच्या तोंडून भरसभेत शिव्या, लाइट गेल्याने म्हणाल्या – हे भो##चे जीवनात अंधार पेरत आहेत

Shivani wadettiwar

वृत्तसंस्था

चंद्रपूर : Shivani wadettiwar  विधानसभा निवडणुकीची तारीख आता जवळ आली आहे. अशात प्रचार सभा जोरात सुरू असल्याचे दिसत आहे. कॉंग्रेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची देखील आकापूर येथे प्रचार सभा पार पडली. यावेळी त्यांची लेक शिवानी वडेट्टीवार यांनी जोरदार भाषण केले आहे. मात्र यावेळी बत्तीगुल झाल्याचे बघून महावितरण विभागवार देखील त्यांनी शिव्यांची लाखोली वाहिली आहे. Shivani wadettiwar

चंद्रपूर येथील ब्रह्मपुरी मतदारसंघातील सावली तालुक्यातील आकापूर या गावात शिवानी वडेट्टीवार यांची प्रचार सभा झाली. या गावात अनेक दिवसांपासून वीज पुरवठा खंडित होत असल्याचे निदर्शनास आले. जेव्हा शिवानी वडेट्टीवार गावात पोहोचल्या, तेव्हाही वीज गेलेली होती, त्यामुळे त्यांनी मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात सभा घेतली. यावेळी त्यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शिव्यांची लाखोली वाहिल्याचे समोर आले आहे. Shivani wadettiwar

शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या, तुमचे जीवन अंधारात टाकायचे काम भाजप सरकार करत आहे. महावितरणवाल्याला झापणार तर आहे, त्याची नाही काढली तर माझं नाव शिवानी विजय वडेट्टीवार नाही. भो**चे रात्रभर वीज घालवूनही यांना 800-1000 रुपये बील पाठवायला लाज वाटत नाही. या लोकांची आम्ही फजिती करू. भाजप सरकारच्या कोणत्याच भूलथापांना बळी पडू नका. विजू भाऊंना बहूमताने निवडून द्यायचे आहे.Shivani wadettiwar

शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या, विकास गुजरातचा होत आहे, तुमच्या गावाचा नाही. तुमच्या जीवनात अंधार पेरण्याचे काम भाजप करत आहे. तसेच, उद्या विजू भाऊ मोठ्या पदावर जाऊ शकतात. ते विरोधी पक्ष नेते असून उद्याचे मुख्यमंत्री असू शकतात, असे सांगत शिवानी वडेट्टीवार यांनी त्यांना निवडून देण्याचे आवाहन केले.

Shivani wadettiwar daughter of the Vadettivars cursed in the rally

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात