दुटप्पी कन्हैया : सनातन धर्माला जाहीर शिव्या; पण निवडणुकीत पराभवाच्या भीतीने घरात यज्ञ करा!!

Kanhaiya Kumar performed hawan and took part in Sarvdharm prayers

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : सनातन धर्माला जाहीर शिव्या, पण निवडणुकीत पराभवाच्या भीतीने घरात यज्ञ करा!!, असे कन्हैया कुमारचे दुटप्पी व्यक्तिमत्व आज उघड्यावर आले. Kanhaiya Kumar performed hawan and took part in Sarvdharm prayers

एकेकाळचा कम्युनिस्ट पार्टीचा कार्ड होल्डर नेता आणि आजचा उत्तर पूर्व दिल्लीतला काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमारने लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यापूर्वी घरात यज्ञ केला स्वतः होम हवनात सहभाग घेतला. त्यानंतर घरातच सर्व धर्मांच्या पुजाऱ्यांना बोलवून आपण सर्वधर्मीय प्रार्थना केल्याचे देखील कन्हैया कुमारने दाखविले आणि त्यानंतरच लोकसभा निवडणुकीतला अर्ज दाखल केला.

हा तोच कन्हैया कुमार आहे जो दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थी कौन्सिलचा प्रमुख असताना “भारत तेरे तुकडे होंगे हजार” अशा घोषणा दिल्या गेल्या होत्या. कन्हैया कुमार येथे काळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा कार्ड होल्डर नेता होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कन्हैया कुमारने बिहार मधल्या बेगूसराय लोकसभा मतदारसंघातून भाजपचे बडे नेते गिरीराज सिंह यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली होती. परंतु तब्बल साडेतीन लाख मतांनी कन्हैया कुमार बेगूसराय मध्ये पडला.

त्यानंतर कन्हैया कुमारने कम्युनिस्ट पार्टी सोडली आणि राहुल गांधींच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेसची कास धरली. राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेमध्ये कन्हैया कुमार आघाडीवर राहिला. याच काळात कन्हैया कुमारने स्टॅलिनपुत्र उदयनिधी स्टालिन याने सनातन धर्माला दिलेल्या शिव्यांचे समर्थन केले होते.

काँग्रेसने त्याला आता पूर्व दिल्लीतून म्हणजेच मुस्लिम बहुल लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार मनोज तिवारी यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत उतरवले आहे. या लोकसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारने आपल्या घरात यज्ञ केला होम हवन केले त्यानंतर सर्व धर्मीय प्रार्थना केली आणि मगच त्याने मिरवणुकीने जाऊन अर्ज दाखल केला.

Kanhaiya Kumar performed hawan and took part in Sarvdharm prayers

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub