भारतात २४ तासात २,७२९ नवे रुग्ण ३२ जणांचा मृत्यू


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतात गेल्या २४ तासात कोरोना व्हायरसच्या २७२९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यासह, संक्रमितांची एकूण संख्या ४३,०६,५४९६ वर गेली आहे. मंगळवारच्या तुलनेत कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये १७.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या संसर्गामुळे आणखी ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. यासह देशात कोविड मुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ५,२३,६५४ झाली आहे.In India, 2,729 new patients in 24 hours 32 killed

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोविड-19 च्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढून १६,२७९ झाली आहे, जी एकूण प्रकरणांच्या ०.०४ टक्के आहे. गेल्या २४ तासांत उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत ६४३ ने वाढ झाली आहे. त्याचबरोबर रुग्ण बरे होण्याचे राष्ट्रीय प्रमाण ९८.७५ टक्के इतके आहे.

आकडेवारीनुसार, संसर्गाचा दैनंदिन दर ०.५८ टक्के असून साप्ताहिक दर ०.५९ टक्के आहे. देशात आतापर्यंत एकूण ४,२५,२५,५६३ लोक संसर्गातून बरे झाले असून कोविड मुळे मृत्यू दर १.२२ टक्के आहे. त्याचबरोबर देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसींचे १८८.१९ कोटीपेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत.

In India, 2,729 new patients in 24 hours 32 killed

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात