प्रत्येकाला ३००० रुपयांचा दंड भरावा लागेल.
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : Smuggling case बनावट भारतीय चलन प्रकरणात एनआयए न्यायालयाने बुधवारी चार जणांना पाच वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. न्यायालयाने त्यांना प्रत्येकी ३,००० रुपयांचा दंडही ठोठावला आहे. या प्रकरणात एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली.Smuggling case
१६ जानेवारी २०२० रोजी नागपूर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) १३ लाख ६७ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या आणि लालू खान, महेश बागवान, रणधीर सिंग ठाकूर आणि रितेश रघुवंशी या चार आरोपींना अटक केली होती. यानंतर, एनआयएने तपास हाती घेतला आणि १० फेब्रुवारी २०२० रोजी गुन्हा दाखल केला.
एनआयएने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पश्चिम बंगालमधील मालदा येथील रहिवासी सोहराब हुसेन याला आरोपपत्रात वॉन्टेड म्हणून दाखवण्यात आले आहे. एनआयएने २९ जून २०२० रोजी हुसेनला अटक केली आणि त्याच वर्षी २४ सप्टेंबर रोजी पुरवणी आरोपपत्र दाखल केले. भारत-बांगलादेश सीमेवरून बनावट नोटा आणि फेन्सेडिल कफ सिरपच्या तस्करीत होसेनचा सहभाग असल्याचे तपासात उघड झाले.
निवेदनात असेही म्हटले आहे की हुसेनचा मृत्यू लखनौ तुरुंगात झाला. इतर सर्व आरोपींनी न्यायालयात आपला गुन्हा कबूल केल्यानंतर न्यायालयाने त्यांना पाच वर्षांची शिक्षा आणि प्रत्येकी ३,००० रुपये दंड ठोठावला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App