Aam Aadmi Party : आम आदमी पार्टीविरुद्ध चार एफआयआर दाखल

Aam Aadmi Party

पंतप्रधान मोदी अन् अमित शहा यांच्या AI जनरेटेड व्हिडिओ प्रकरणी


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Aam Aadmi Party  आम आदमी पक्षाविरुद्ध अलिकडेच चार स्वतंत्र एफआयआर दाखल करण्यात आले आहेत, ज्यामध्ये गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या एफआयआरमध्ये पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांविरुद्ध अपमानास्पद कंटेट पसरवणे आणि संवैधानिक पदांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणे असे आरोप आहेत.Aam Aadmi Party

पहिल्या एफआयआरनुसार, ‘आप’ने सोशल मीडियावर पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांविरुद्ध अपमानास्पद पोस्ट आणि अॅनिमेटेड कंटेंट शेअर केले. या पोस्ट ‘जनतेच्या भावना भडकवण्याच्या’ उद्देशाने तयार केल्या गेल्याचे म्हटले जाते. पक्षाविरुद्ध बीएनएस आणि आयटी कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



दुसऱ्या एफआयआरमध्ये, ‘आप’ने गृहमंत्र्यांच्या आवाजाचा वापर करून दिशाभूल करणारी सामग्री पोस्ट केल्याचा आरोप आहे. ही पोस्ट धार्मिक सलोखा बिघडवण्यासाठी आणि गृहमंत्र्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी तयार करण्यात आली होती.

तिसऱ्या एफआयआरमध्ये असा आरोप आहे की ‘आप’ने पंतप्रधानांविरुद्ध मॉर्फ केलेले फोटो आणि चुकीची माहिती प्रसारित केली. ‘सामाजिक रचनेला हानी पोहोचवण्याच्या’ आणि पंतप्रधानांची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने हा मजकूर शेअर करण्यात आला होता.

चौथ्या एफआयआरमध्ये, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर राम गुप्ता यांच्यावर पंतप्रधानांच्या निवासस्थानाबद्दल दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याचा आरोप आहे. पोस्टमध्ये असे म्हटले होते की पंतप्रधानांच्या निवासस्थानाचे २,७०० कोटी रुपयांमध्ये नूतनीकरण करण्यात आले आहे. एफआयआरमध्ये हा दावा पूर्णपणे खोटा आणि जनतेची दिशाभूल करणारा असल्याचे म्हटले आहे..

Four FIRs filed against Aam Aadmi Party

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात