विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्ली मद्य प्रकरणात अटक करण्यात आलेले मनीष सिसोदिया अद्याप तुरुंगातून बाहेर आलेले नाही. दिल्ली अबकारी धोरण घोटाळा प्रकरणाशी संबंधित सीबीआय प्रकरणात राऊस एव्हेन्यू कोर्टाने मोठा निकाल दिला असून मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत 19 जानेवारीपर्यंत वाढ केली आहे.Delhi Liquor Policy Case Manish Sisodias New Year will be celebrated in jail court’s big decision in CBI case
या आदेशाचा अर्थ मनीष सिसोदियांचे नवीन वर्ष तुरुंगातच साजरे होणार आहे. मनीष सिसोदिया हे या प्रकरणातील सहआरोपी असून, बराच काळ न्यायालयीन कोठडीत आहेत.
वास्तविक, मनीष सिसोदिया यांची न्यायालयीन कोठडी आज संपत होती, त्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेत न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी केली.
दिल्ली मद्य घोटाळ्यातील आरोपी मनीष सिसोदिया आणि इतर आरोपींच्या वतीने आरोपपत्रातील कागदपत्रे तपासण्यासाठी सीबीआय कार्यालयात जाण्यासाठी १५ जानेवारीपर्यंत वेळ देण्यात आली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App