राजधानी नवी दिल्लीतल्या 5 स्टार हॉटेल अशोका मध्ये 28 पक्षांच्या INDI आघाडीची बैठक परवा झाली. काल आघाडीतल्या जागा वाटपाची चर्चा देखील समोर आली, पण त्यातल्या चर्चेतल्या सामंजस्यापेक्षा मतभेदाच्याच बातम्या जास्त चर्चेच्या ठरल्या. कारण काँग्रेस, ममता बॅनर्जींची तृणमूल काँग्रेस आणि अरविंद केजरीवालांची आम आदमी पार्टी आणि सीताराम येचुरी यांची मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी यांनी परस्परांना जागा वाटपात सहकार्य करण्याऐवजी शह – काटशहाचेच राजकारण करण्यात धान्यता मानल्याच्या बातम्या आल्या. Body language of both Sonia Gandhi and mamata banerjee showed fade future of INDI alliance!!
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल मध्ये काँग्रेसला लोकसभेच्या फक्त 2 जागा देऊ केल्या, त्या बदल्यात काँग्रेसकडे सिक्कीम आणि मेघालयातल्या लोकसभेच्या जागा मागितल्या. काँग्रेसने पंजाब मध्ये आम आदमी पार्टीला स्वतःकडे असलेल्या 11 जागांपैकी एकही जागा देऊ शकणार नसल्याचे सांगून टाकले. पंजाब प्रदेश काँग्रेसचा आम आदमी पार्टीशी युती करायला विरोध असल्याने आम्हाला पंजाब मध्ये आम आदमी पार्टीशी सहकार्य करणे शक्य नाही असे काँग्रेस नेते केजरीवालांच्या प्रतिनिधी नेत्यांना सांगून मोकळे झाले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी पश्चिम बंगाल मध्ये काँग्रेस बरोबर जाण्याचे तयारी दाखवली पण ममता बॅनर्जींच्या तृणमूळ काँग्रेसला विरोध कायम ठेवला.
पण या झाल्या, मतभेदांच्या “जाहीर” झालेल्या बातम्या… मात्र या मतभेदांची बीजे अशोका हॉटेलमध्ये झालेल्या INDI आघाडीच्या बैठकीत आधीच पेरली गेली होती.
कारण त्या बैठकीत ममता बॅनर्जींनी काँग्रेसमध्ये “राजकीय अणुस्फोट” घडविला. त्यांनी राहुल गांधींचा पत्ता “कट” करण्यासाठी दलित पंतप्रधान म्हणून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव सुचवले. त्यामुळे राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियांका गांधी, शरद पवार, नीतीश कुमार, एम. के. स्टालिन आदी नेत्यांचा “पापड मोडला”!!
फक्त अरविंद केजरीवालांनी ममतांचा विशिष्ट डाव ओळखून त्यांना पाठिंबा दिला, पण त्यापलीकडे देखील आघाडीतल्या मतभेदांची बीजे नेत्यांच्या वक्तव्यातून आणि त्याहीपेक्षा बॉडी लँग्वेज मधून दिसली.
खुद्द राहुल गांधींनी या बैठकीपूर्वीचा एक फोटो आपल्या व्हाट्सअप चॅनेलवर शेअर केला, हाच “तो” फोटो आहे, ज्यात सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी अशोक हॉटेल मधल्या बैठकीच्या हॉलमध्ये जाताना दिसतात. सोनिया गांधी पुढे चालल्यात. ममता त्यांच्या मागून चालल्यात, पण दोघींचे तणावग्रस्त चेहरे आणि बॉडी लँग्वेज एकमेकांपासून कायमचे अंतर राखल्याचेच दाखवून देतात. सोनिया गांधींना ममतांचे राजकीय अस्तित्व पश्चिम बंगाल पुरते सीमित ठेवायचे आणि तिथेही कमी करायचे आहे, तर ममता बॅनर्जींना राष्ट्रीय पातळीवर काय व्हायचे ते होवो, पण राहुल गांधी बिलकुल नकोत, हे “निश्चित” करायचे आहे.
ज्यार्थी राहुल गांधींनी स्वतःहून “निवडून” आपल्या व्हाट्सअप चॅनेलवर सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जींचा हा फोटो शेअर केला, याचा नेमका अर्थ त्यांना या फोटोतून कोणता मेसेज द्यायचा आहे, हे लगेच कळून चुकते. त्या फोटोतून सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांची दिसलेली बॉडी लँग्वेज INDI आघाडीच्या भवितव्यातले उघड गुपीत सांगून जाते!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App