दिल्ली विधेयक राज्यसभेत मंजूर, राष्ट्रपतींकडे जाणार; आतापर्यंत विरोधी पक्षाचे 141 खासदार निलंबित

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज (19 डिसेंबर) 12 वा दिवस आहे. राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली कायदे (विशेष तरतुदी) द्वितीय (दुरुस्ती) विधेयक 2023 राज्यसभेत मंजूर करण्यात आले. पावसाळी अधिवेशनात हे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले. आता हे विधेयक स्वाक्षरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात येणार आहे. Delhi Bill passed by Rajya Sabha, goes to President; So far, 141 opposition MPs have been suspended

यापूर्वी खासदारांच्या निलंबनावरून दोन्ही सभागृहात गदारोळ झाला होता. विरोधी खासदारांनी घोषणाबाजी करत सभागृहाच्या गेटवर आणि आवारात निदर्शने केली. सकाळपासून लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज तीनवेळा तहकूब करण्यात आले.

यानंतर 49 विरोधी खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले. त्यामुळे आता एकूण 141 खासदारांना सभागृहाच्या कामकाजात भाग घेता येणार नाही. एवढेच नाही तर लोकसभेच्या प्रश्न यादीतून 27 प्रश्न काढून टाकण्यात आले आहेत. जे प्रश्न निलंबित खासदारांच्या वतीने विचारण्यात आले होते.


92 खासदारांच्या निलंबनानंतर सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, शशी थरूर, मोहम्मद फैजल यांच्याही निलंबनाचा लागला नंबर!!


स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच इतक्या खासदारांचे निलंबन

सोमवारी म्हणजेच 18 डिसेंबर रोजी एकूण 78 खासदार (लोकसभा-33, राज्यसभा-45) निलंबित करण्यात आले. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एकाच दिवसात इतक्या खासदारांचे निलंबन झाले आहे. यापूर्वी 1989 मध्ये राजीव सरकारमध्ये 63 खासदारांना निलंबित करण्यात आले होते. गेल्या आठवड्यातही 14 खासदारांना निलंबित करण्यात आले होते.

मिमिक्रीवर धनखड संतापले; म्हणाले- देव सुबुद्धी देवो

टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या मिमिक्री व्हिडिओवर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी सभागृहात नाराजी व्यक्त केली. एका खासदाराने टीव्हीवर अधोगतीची हद्द ओलांडल्याचे ते सभागृहात म्हणाले. ते म्हणाले की मर्यादा असते. वाहिनीसमोर सभागृहाच्या शिष्टाचाराचे उल्लंघन झाले आहे. ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवो.

निलंबनानंतर लोकसभेत उरले 102 विरोधी खासदार​, तर राज्यसभेत उरले 106 विरोधी खासदार

लोकसभेत सध्या 538 खासदार आहेत. त्यात एनडीएचे 329 खासदार आहेत. 14 डिसेंबरला 13 विरोधी खासदार, 18 डिसेंबरला 45 आणि 19 डिसेंबरला 49 खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं. आतापर्यंत 107 खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे आता सभागृहात विरोधी पक्षाचे 102 खासदार उरले आहेत.

राज्यसभेत सध्या 245 खासदार आहेत. भाजप आणि मित्रपक्षांचे 105 खासदार आहेत. विरोधी पक्षाच्या 34 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबनानंतर 106 विरोधी खासदार सभागृहात उरले होते.

Delhi Bill passed by Rajya Sabha, goes to President; So far, 141 opposition MPs have been suspended

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात