पाकिस्तानातील आर्थिक, राजकीय परिस्थितीही बऱ्याच काळापासून वाईट आहे.
विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : पाकिस्तान शेअर बाजारात घसरणीचा विक्रम पाहायला मिळत आहे. मंगळवारी, स्टॉक एक्स्चेंजने 32 वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठी घसरण पाहिली. मंगळवारी पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजमध्ये 2300 अंकांची मोठी घसरण नोंदवण्यात आली.Biggest decline in Pakistans stock market in 32 year history
भारतीय बाजार दररोज चढ-उताराचे नवे विक्रम रचत असतानाच शेजारील देश पाकिस्तानच्या शेअर बाजारात घसरणीचे नवे विक्रम पाहायला मिळत आहेत.
पाकिस्तान शेअर बाजाराच्या या घसरणीचे कारण म्हणजे निवडणुकांची वेध आणि आर्थिक आघाडीवर अस्थिरता. निवडणुकीपूर्वीची भीती किंवा अस्थिरतेच्या भीतीने पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजच्या शेअर्समध्ये घसरण होत आहे.
याशिवाय पाकिस्तानातील आर्थिक, राजकीय परिस्थितीही बऱ्याच काळापासून वाईट आहे. या परिणामांमुळे या बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचा स्वारस्य कमी होत आहे आणि FII कर्ज प्रवाहात 50 टक्क्यांपर्यंत घसरण दिसून आली आहे
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App