विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : एकीकडे मोदी विरोधी INDI आघाडीला देशातले बुद्धिमंत लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करत आहेत, तर दुसरीकडे भाजपने मोदी सरकार पुन्हा निवडून आणण्यासाठी लोकसभेच्या जागांचे नव्हे, तर थेट कोट्यावधी मतांचे टार्गेट सेट केले आहे. ही मतं संख्या किरकोळ नव्हे, तर तब्बल 35 कोटींची आहे. 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला संपूर्ण देशभरातून 22 कोटी मते मिळाली होती. त्या बळावरच भाजपने लोकसभेच्या 303 जागा जिंकल्या होत्या. त्या तुलनेत भाजपने 2024 च्या लोकसभेच्या जागांचे टार्गेट निश्चित करण्यापेक्षा थेट मतांचे टार्गेटच निश्चित केले आहे आणि ते टार्गेट देखील तब्बल 13 कोटी मतांनी वाढवून घेतले आहे. BJP’s target of 35 crore votes in loksabha
मोदी विरोधकांची INDI आघाडी आणि सत्ताधारी भाजप यांच्यातला हाच तर सर्वांत महत्त्वाचा आणि निर्णायक फरक आहे. INDI आघाडीतले घटक पक्ष आजही वेगवेगळ्या तोंडांनी बोलत आहेत. त्यांच्या निवडणूक नियोजनाचा अजून कुठला पत्ताही लागलेला नाही. उलट काँग्रेस आणिINDI आघाडीतल्या घटक पक्षांनी लोकसभेची निवडणूक लढवू नये त्यांनी व निवडणुकीवर बहिष्कार घालावा अशी सूचना विचारवंत राजू परुळेकर आणि अजय राय यांनी केली आहे.
INDI आघाडी देखील नुसत्या 5 हॉटेलमधल्या बैठका, चहा – बिस्किटे आणि सामोसे यावरच चर्चा असल्या राजकीय जंजाळात आघाडी अडकली आहे, तर त्यापलीकडे जाऊन भाजपने मात्र कमळ चिन्हावर 35 कोटी मते मिळवण्याचे टार्गेट ठेवले आहे.
लोकसभा निवडणुकीसंदर्भात भाजपाने 22 आणि 23 डिसेंबरला दिल्लीतील पक्ष मुख्यालयात बैठक बोलावली आहे. देशातील सगळे प्रदेशाध्यक्ष, संघटन महामंत्री, राष्ट्रीय पदाधिकारी आणि सर्व मोर्चाचे अध्यक्ष सहभागी होतील. बैठकीनंतर संघटन महामंत्र्यांसोबत बैठक होईल. यामध्ये विकसित भारत संकल्प अभियान समीक्षा केली जाईल. बलस्थाने आणि उणीवांची चर्चा करून पुढच्या सूचना देण्यात येतील.
2019 मध्ये किती जागा जिंकलेल्या?
5 राज्यातील विधानसभा निवडणुका जिंकून भाजप अपबीट मूडमध्ये आहे. मध्य प्रदेशात भाजपा सत्ता टिकवण्यात यशस्वी ठरली. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला हरवून सत्ता मिळवली. भाजपाने 2024 साठी 35 कोटी मते मिळावायचे टार्गेट ठेवले आहे. 2019 मध्ये भाजपाने 303 जागा जिंकल्या होत्या. मिशन 2024 फत्ते करण्यासाठी पंतप्रधान मोदी, अमित शाहांचे दौरे सुरु झाले आहेत..
किती कोटी मतदार मिळवण्याच टार्गेट?
लोकसभा निवडणुकीसाठी जेपी नड्डा यांनी 35 कोटी मतदानाचे टार्गेट सेट केले आहे. 2019 मध्ये भाजपाला 22 कोटी मते मिळाली होती. त्यामुळे केवळ फक्त बोलायचे म्हणून नवीन टार्गेट सेट केलेले नाही, तर आधीपासून जिल्हा कार्यालयात 300 पेक्षा जास्त कॉल सेंटर कार्यरत आहेत. जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि आमदार जनसंर्पक वाढवत आहेत.
कॉल सेंटर कुठे आहेत ?
बहुतांश कॉल सेंटर जिल्हा पार्टी कार्यालयात आहेत. त्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात 50 लाख लोकांना जोडण्याचे टार्गेट आहे. पक्षासाठी सक्रीय योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा शोध सुरु आहे. याच कॉल सेंटरच्या माध्यमातून सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा उद्देश आहे. लाभार्थी सूचीमध्ये आणखी 70 लाख लोकांना जोडण्याच टार्गेट आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App