आगामी आयपीएल मध्ये खेळणार दीपिका रणवीरची टीम?


विशेष प्रतिनिधी

दुबई : जुही चावला, शाहरूख खान, प्रीती झिंटा या कलाकारांनंतर रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण आयपीएलमध्ये एक नवा संघ खरेदी करणार असल्याची माहिती सध्या व्हायरल होत आहे. बॉलीवूडमधील बाजीराव मस्तानी म्हणून प्रसिद्ध असणारे हे कपल नुकतेच दुबईला गेले असल्याची माहिती मिळाली आहे.

Deepika Ranveer’s team to play in upcoming IPL?

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार आगामी आयपीएलमध्ये 8 ऐवजी एकूण 10 संघांचा समावेश असणार आहे. याचा अर्थ आयपीएलमध्ये 2 नवे संघ असणार आहेत. नेमके हे संघ कोणते आहेत? याची कोणतीही माहिती अजूनही उपलब्ध नाहीये. हे दोन संघ खरेदी करण्यासाठीचा लिलाव दुबईमध्ये आयोजित केला होता. त्याच साठी दीपिका आणि रणवीर दुबई मध्ये गेल्याचे म्हटले जात आहे.


रणवीर, दीपिकाला अलिबागची भुरळ तब्बल ९० गुंठे जागा २२ कोटींना केली खरेदी


दीपका आणि रणवीर सोबत तेथे मोठमोठे कलाकार सहभागी होण्याची शक्यता आहे. भारतातील अनेक कलाकार तसेच मोठ मोठे बिझनेसमन ही क्रिकेट टीम खरेदी करण्यासाठी उत्सुक असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये रणवीर आणि दीपिका यांचे नाव देखील समोर येत आहे आणि या संदर्भात त्यांनी अर्ज देखील दाखल केला आहे.

ज्या दोन नव्या टीम असतील त्यासाठी सर्व खेळाडूंचा लिलाव पुन्हा एकदा केला जाणार आहे. म्हणजे प्रत्येक खेळाडूवर आगामी आयपीएलमध्ये पुन्हा बोली लावली जाणार आहे. त्यामुळेच रणवीर दीपिका या जोडीने क्रिकेटची टीम खरेदी केली तर जुही चावला, शाहरूख खान, प्रीती झिंटा यांच्या यादीमध्ये ते सहभागी होतील.

Deepika Ranveer’s team to play in upcoming IPL?

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात